जयहिंद स्पोर्ट्स क्लब खारघर च्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी

जयहिंद स्पोर्ट्स क्लब खारघर च्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी


खारघर प्रतिनिधी दि.२३-

आज 23 जानेवारी भारत मातेचे महान थोर सुपुत्र महान स्वातंत्र्य सेनानी. **आझाद हिंद सेनेचे सेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म दिवस.** जयहिंद स्पोर्ट्स क्लब खारघर च्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला नीलकंठ कळंबे सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी जयहिंद स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक/ अध्यक्ष श्री कृष्णा खडगी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अतिशय मोलाचे योगदान आहे. त्यांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी *आझाद हिंद सेनेची स्थापना केली*. आणि त्या आझाद हिंद सेनेने भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.आपल्या भारत देशाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी *'जयहिंद' चा   नारा दिला. जो आज आपले बच्चे कंपनी. युवा आणि बुजुर्ग आणि आपल्या संपूर्ण भारतीय सैन्य दलाचे* घोष वाक्य झालेले आहे*. त्याच प्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आणखी एक अतिशय महत्वाचा     नारा दिला होता तो हा **तुम मुझे खून दो. मै तुम्हे आझादी dunga** या घोषणेमुळे लाखो भारतीय युवक आझाद हिंद सेने मध्ये सामील झाले आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. त्यांच्या याच घोषणे पासून प्रेरणा घेऊन जयहिंद स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक/अध्यक्ष श्री. कृष्णा खडगी यांनी महाराष्ट्र शासन..      सिडको प्रशासन..आणि पनवेल महानगरपालिका प्रशासनाकडे मागील 11 ते 12 वर्षांपासून ग्राउंड  साठी पत्रव्यवहार सुरू केलेला आहे. आणि आज पर्यंत तो सतत सुरू आहे. त्याच प्रमाणे त्यांनी वरील तिन्ही प्रशासनाला अपील केले आहे की **तुम मुझे ग्राउंड दो. मै तुम्हे खिलाडी dunga ** जयहिंद स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून खारघर आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील मुलां-मुलींना तसेच विद्यार्थी- विद्यार्थी नी आणि युवा वर्गाला क्रिकेटचे प्रशिक्षण देत आहे.  आज  जयहिंद स्पोर्ट्स क्लबचे कित्येक खेळाडू मुले-मुली  मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या स्कूल. कॉलेज. क्लब. कॉर्पोरेट आणि राज्य पातळीवर प्रतिनिधित्व करीत आहे. त्याच प्रमाणे युवा क्रिकेट खेळाडू रणजी. इंडिया (A) तसेच आयपीएल च्या खेळाडू सोबत प्रॅक्टिस करीत आहे. ही आपल्या खारघर आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील जनतेसाठी खूप अभिमानाची बाब आहे. आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त जयहिंद स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू मुख्य प्रशिक्षक योगेश सर. आणि विभागातील नागरिक श्री. नीलकंठ कळंबे सर.. सिद्धार्थ मेश्राम. जगदीश बोदेले. प्रकाश हडगली. भगवान पाटील. Damodharan..आणि प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार श्रीयुत. मगर साहेब उपस्थित होते..     यासर्वांच्या उपस्थितीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि पुष्पसुमन अर्पण करून अभिवादन करण्यात आले.