शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’

शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा'


पनवेल:
पनवेल तालुक्यातील माेहाे येथील िजल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत १८ वर्षांपूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली. त्यावेळचेच िशक्षक अािण विद्यार्थ्यांमुळे जणू काही शाळेचा वर्गच पुन्हा भरल्याचा भास सर्वांना झाला.यावेळी िशक्षकांसाेबतचे प्रसंग, बाकांवरच्या मित्र-मैत्रिणींसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
माेहाे येथील िजल्हा परिषदेच्या शाळेत २००१ ते २००६ पर्यंत पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन बुधवारी (ता ०८) पार पडले.
या स्नेहसंमेलनासाठी त्यावेळच्या मुख्याध्यापिका रसाळ मॅडम, िशक्षक िचलवंत सर, ठाकरे सर, िशक्षिका भगत मॅडम, म्हात्रे मॅडम, बावा मॅडम, सावंत मॅडम अावर्जून उपस्थित हाेत्या.
यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देताना शाळेतल्या गंमतीजमती सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी विद्यार्थ्यांशी उपस्थित शिक्षकांनी संवाद साधत माेहाे शाळेतील त्यांच्या अाठवणी पुन्हा जागवल्या.
समाजात वावरताना उत्तम माणूस म्हणून जगा. अडचणीत असलेल्या प्रत्येकाला मदत करण्याचा दृष्टिकाेन कायम ठेवा, असे उपदेशाचे धडे िशक्षकांनी पुन्हा एकदा माजी िवद्यार्थ्यांना िदले.
यावेळी माजी  विद्यार्थ्यांनी िशक्षकांच्या प्रेमाची छडी खात त्यांचे अाशीर्वाद घेतले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेजस, िवकास, परेश, अरविंद, भूषण, नारायण, अमर, अितश, अावनी, अस्मिता, पुजा, श्रद्धा, प्रणाली, िप्रयंका अादी माजी विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.

विद्यार्थ्यांसह शिक्षकही भारावले
शाळेतील सवंगडी, शाळेचा वर्ग, लाकडी बाकडे यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते.  शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकांवर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येतेच. यासाठी अशा स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात यावे, अशी भावना अनेकांनी यावेळी व्यक्त केली.  बऱ्याच वर्षाच्या गाठीभेटीने विद्यार्थ्यांसह शिक्षकही भारावले. सर्वांनी एकमेकांना पुढील वाटचालीसाठी, निरोगी व आरोग्यदायी आनंदी जीवनासाठी शुभेच्छा देवून निरोप घेतला.



Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image