अतिक्रमण विभागामार्फत नेरुळ, तुर्भे व ऐरोली विभागात निष्कासनाची कारवाई केली
नवी मुंबई/प्रतिनिधी-नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने नेरुळ, तुर्भे व ऐरोली विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नेरुळ विभागाअंतर्गत 1) श्री. शिशीर आर. शहा, प्लॉट नं-323, फ्लॅट नं-102, गा.वि.यो. सारसोळे, से-6 ए, नेरुळ, नवी मुंबई., यांचे सदर ठिकाणी प्रत्यक्ष पहाणी केली असता मंजूर नकाशामध्ये नकाशा व्यतिरिक्त अंदाजे 6m X 5m मोजमापाचे बांधकाम करुन 2 लाँड्री, 1 ऑफीस व पुढील मर्जिनल स्पेसमध्ये भाजीपाला विक्रीचा अनधिकृतरित्या वाणिज्य वापर घेत असल्याचे व 2) श्री. सिंग गुरुदिर पाल, किरीट टोज, प्लॉट नं-13ए GES, सारसोळे, नेरूळ, नवी मुंबई, यांचे सदर ठिकाणी प्रत्यक्ष पहाणी केली असता मंजुर नकाशामध्ये रहिवाशी वापर असताना फ्लॅट च्या ऐवजी अंदाजे 3.00m X 9.00m मोजमापाचे शॉप असून मार्जीनल स्पेसमध्ये 3.60m X 9.00m मोजमापाचे अनधिकृत बांधकाम करुन वाणिज्य वापर करित असल्याचे निदर्शनास आल्याने सदर अनधिकृत बांधकामधारकांना अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नेरुळ विभाग कार्यालयाकडून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 53 (1अ) अन्वये प्रत्येकी दि.12/08/2024 व 02/08/2024 रोजी नोटीस बजावण्यात आलेली होती. तथापि, नोटीसीची मुदत संपुष्टात येऊनही अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविण्यात आले नाही.
सदर कारवाई सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. जयंत जावडेकर व अतिक्रमण विभागातील कर्मचारी, 08 मजूर, 1 गॅस कटर, 2 ब्रेकर च्या सहाय्याने अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक समवेत सुरक्षारक्षक यांच्या मार्फत करण्यात आली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तुर्भे विभागाअंतर्गत श्री. गोपाल चव्हाण, रुम नं. अ- 2/578, से. 20, तुर्भे, नवी मुंबई, यांनी वरील नमुद पत्यावर प्रत्यक्ष ठिकाणी स्थळपाहणी केली असता विनापरवानगी अनधिकृतरित्या 4.00 मी. X 5.50 मी. मोजमापाच्या क्षेत्रफळात (G+3) आर.सी.सी. स्वरुपात बांधकाम चालु असल्याचे निदर्शनास आले आहे.
सदर अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. परंतु, सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरुच होते. त्याअनुषंगाने, सदर अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाईच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर ठिकाणी दि. 07/01/2025 रोजी कारवाई करुन सदरचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आलेले आहे.
श्री. दशरथलाल रामधर गुप्ता, एस. एस. टाईप, रुम नं. A/1/87/07, सेक्टर 21, तुर्भे, नवी मुंबई, यांनी वरील नमुद पत्यावर प्रतयक्ष ठिकाणी स्थळपाहणी केली असता विनापरवानगी अनधिकृतरित्या 8.90 मी. X 7.20 मी. मोजमापाच्या क्षेत्रफळा मध्ये तळ +2 (G+2) आर.सी.सी. स्वरुपात बांधकाम करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
सदर अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. परंतु, सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरुच होते. त्याअनुषंगाने, सदर अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाईच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर ठिकाणी दि. 07/01/2025 रोजी कारवाई करुन सदरचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आलेले आहे.
श्रीम. मनिनी प्रभाकर जाधव, रुम नं. अ-1/8/2, सेक्टर 21, तुर्भे, नवी मुंबई, यांनी वरील नमुद पत्यावर प्रतयक्ष ठिकाणी स्थळपाहणी केली असता विनापरवानगी अनधिकृतरित्या 4.00 मी. X 8.00 मी. मोजमापाच्या क्षेत्रफळात (G+3) आर.सी.सी. स्वरुपात बांधकाम चालु असल्याचे निदर्शनास आले आहे.
सदर अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. परंतु, सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरुच होते.
त्याअनुषंगाने, सदर अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाईच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर ठिकाणी दि. 07/01/2025 रोजी कारवाई करुन सदरचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आलेले आहे.
मालमत्ताधारक, साईबाबा मंदिराशेजारी, कोपरीगांव, नवी मुंबई, यांनी विनापरवानगी साईबाबा मंदिराशेजारी सुमारे 9.50 मी. X 12.00 मी. या मोजमापाचे R.C.C. Plinth चे बांधकाम सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे.
सदर अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. परंतु, सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरुच होते. त्याअनुषंगाने, सदर अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाईच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर ठिकाणी दि. 07/01/2025 रोजी कारवाई करुन सदरचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आलेले आहे.
श्री. देविदास रामदास भोईर, रुम नं. 1902/0003 व 1902/0004, सेक्टर 26, कोपरीगांव, नवी मुंबई, यांनी वरील नमुद पत्यावर प्रतयक्ष ठिकाणी स्थळपाहणी केली असता विनापरवानगी अनधिकृतरित्या 12.30 मी. X 11.50 मी. मोजमापाच्या क्षेत्रफळात (G+1) आर.सी.सी. स्वरुपात बांधकाम चालु असल्याचे निदर्शनास आले आहे.
सदर अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. परंतु, सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरुच होते. त्याअनुषंगाने, सदर अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाईच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर ठिकाणी दि. 07/01/2025 व दि. 08/01/2025 रोजी कारवाई करुन सदरचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आलेले आहे.
सदर मोहिम सहाय्यक आयुक्त, तुर्भे श्री. प्रबोधन मवाडे, कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे व इतर अधिकारी/कर्मचारी यांचे उपस्थिती मध्ये करण्यात आली आहे. तसेच सदर मोहिमेसाठी अतिक्रमण निर्मुलन पथकातील पोलीस अधिकारी/अंमलदार आणि अतिक्रमण विभागातील सुरक्षारक्षक देखील तैनात ठेवण्यात आले होते. वरील अनधिकृत बांधकाम हटविण्याकरीता 01 पोकलेन, 01 जे.सी.बी., 04 इलेक्ट्रीक हॅमर, 02 गॅस कटर, 20 मजूर यांचा वापर करण्यात आला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील ऐरोली विभागात रो हाऊस क्र-बी-24 व बी-45, से-04, ऐरोली येथील आरसीसी इमारतीचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु केले होते. सदर अनधिकृत बांधकामास ऐरोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते. सदरचे अनधिकृत बांधकाम आज दिनांक 08/01/2025 रोजी अतिक्रमण मोहिम राबवुन सदर बांधकाम अंशत: निष्कासित करण्यात आले आहे.
या धडक मोहिमेसाठी 4 हॅमर, 2 गॅस कटर, 4 ब्रेकर, 15 मजूर व 01 मुकादम यांचा वापर करण्यात आलेला असून मोहिमेकरीता जी विभाग ऐरोली चे सहाय्यक आयुक्त डॉ. अंकुश जाधव, कनिष्ठ अभियंता संदीप म्हात्रे व इतर अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. सदर कारवाई अंतर्गत दंडात्मक शुल्क रूपये 50,000/- वसूलकरण्यात आले आहे.
तसेच यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे.