माझी मुंबई क्रिकेट संघात अमित नाईक याची निवड, शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांनी दिल्या शुभेच्छा
पनवेल : आपल्या उरण तालुक्यातील एकटघर गावातील श्री.अमित नाईक या तरुणाची भारतातील सर्वात मोठी टेनिस क्रिकेट स्पर्धा म्हणजेच इंडियन स्ट्रीट प्रिमीयर लीग (ISPL) मधील सिनेस्टार श्री.अभिषेक बच्चन यांच्या मालकीची असलेली माझी मुंबई” या क्रिकेट संघात निवड झाली आहे. त्याबद्दल त्याचे पनवेल महानगरपालिकेचे शेकापचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी अभिनंदन केले.
आपल्या भागातील तरुण जेव्हा अशा प्रकारे नॅशनल आणि इंटरनॅशनल पातळीवरती जाऊन आपले आणि आपल्या गावाचे तालुक्याचे नाव उंचावतात हे नक्कीच माझ्यासारख्या तरुणाला अभिमानाची गोष्ट आहे.
अमितला त्याच्या पुढील क्रीडा क्षेत्रातील यशस्वी कारकीर्दीसाठी प्रीतम म्हात्रे यांनी शुभेच्छा दिल्या!