वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट


पनवेल ता.16(बातमीदार)कळंबोली वसाहत ही समुद्र सपाटीपासून तिन मिटर खोल असल्याने पाणी साचून रस्त्याची दुरावस्था होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कामोठा,कळंबोली, खारघर व नवीन पनवेल येथील मुख्य रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण व गटराची कामे सुरू आहेत.त्या अनुषंगाने ही कामे लवकरात लवकर पूर्ण करून वसाहती मधील नागरिकांना दिलासा मिळावा या साठी शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी 16 रोजी आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेतली. पालिकाक्षेत्रातील वसाहतीमध्ये मोठ्याप्रमाणात रस्त्यांची दुरावस्था झाली होती. तसेच कळंबोली कॉलनी समुद्रसपाटीपासून साडेतीन मीटर खाली असल्याने. कमी पावसातही वसाहत जलमय होते. त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था होते. वसाहत अंतर्गत रोडची एक प्रकारे चाळण झाली होती. कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण व गटराची कामे जवळपास एक वर्षांपासून सुरू आहेत. मध्यंतरी पावसाळ्यात या कामांमध्ये खंड पडला होता. परंतु या कामामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत आहे. ही प्रस्तावित कामे लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना दिलासा मिळावा या साठी आयुक्तांना निवेदन देण्यात आले. याबाबत त्वरित कार्यवाही करण्याची ग्वाही आयुक्तानी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिली. या वेळी शिवाजी थोरवे, सुनिल गोवारी, सुभाष घाडगे अदी उपस्थित होते.

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image