फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा -एंजेल वनचे आवाहन

 फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा -एंजेल वनचे आवाहन 

नवी मुंबई/पनवेल (प्रतिनिधी) फिनटेक क्षेत्रातील आघाडीची कंपनी एंजेल वन लिमिटेडने एंजल वनच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या तसेच त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे वापरून तोतयागिरी करणाऱ्या फसव्या सोशल मीडिया गटांच्या वाढत्या व्याप्तीबद्दल गुंतवणूकदारांना सतर्क करत असून एंजेल वनशी संबंध असल्याचा खोटा दावा करूनसोशल मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर अनेक अनधिकृत गट तयार होत असल्याचे या कंपनीच्या निरीक्षणात आले आहे.          

      आवश्यक सेबी नोंदणी/परवानगीशिवाय सिक्युरिटीजशी संबंधित सल्ला किंवा शिफारसी प्रदान करणेतसेच सेबी च्या मंजुरीशिवाय सिक्युरिटीजशी संबंधित परतावा आणि कामगिरीबद्दल अनधिकृत दावे करणेअशा बेकायदेशीर गोष्टींमध्ये हे फसवे गट गुंतले आहेतहे एंजेल वनने ओळखले आहे.   व्हॉट्सॲप आणि टेलीग्राम ग्रुप एंजल वन लिमिटेडचे ब्रँड नाव आणि लोगो तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे आणि प्रतिमा यांचा बेकायदेशीरपणे आणि भ्रामकपणे गैरवापर करत आहेत. आणि ते एंजल वन लिमिटेडशी संबंधित आहेत असा विश्वास ठेवत सर्वसामान्यांची दिशाभूल करत आहेत. अनधिकृतरित्या गुंतवणुकीचा सल्ला देणे किंवा सिक्युरिटीज मार्केटमध्ये परताव्याची हमी देणे हे कायद्याने निषिद्ध आहे. त्यामुळेच आम्ही गुंतवणूकदारांना योग्य ती माहिती घेण्यास तसेच आमच्या संस्थेकडून व्यवहार झाल्याचा किंवा माहिती मिळाल्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही घटनेची सत्यता पडताळून पाहण्याचे आवाहन केले आहे. 

        कायदेशीर गुंतवणुकीचे निर्णय नेहमी सखोल संशोधन आणि अधिकृत स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित असावेत. एंजेल वन लिमिटेडचा कोणत्याही बनावट ॲप्लिकेशन्सवेब लिंक्स किंवा खासगी व्हॉट्सॲप/टेलीग्राम ग्रुप्सशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणताही संबंध नाही आणि फसव्या ॲप्लिकेशन्स किंवा वेब लिंक्सच्या व्यवहारामुळे होणाऱ्या कोणत्याही आर्थिक नुकसानासाठी किंवा परिणामांसाठी ते जबाबदार राहणार नाहीतअसे एंजेल वनने म्हटले आहे. एंजेल वन गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आणि सुरक्षित व्यापार पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे. सर्व गुंतवणूकदारांना सतर्क राहण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यासाठी कंपनी प्रोत्साहन देते.अशा संस्थांशी जोडले जाऊ नकातसेच कोणत्याही संशयास्पद गोष्टींची माहिती त्वरित कायदेशीर यंत्रणांना द्याअसा सल्ला जनतेला दिला जातो. तुम्हाला कोणतेही संभाव्य घोटाळे आढळल्यासते सायबर क्राईम पोर्टलद्वारे cybercrime.gov.inतसेच १९३० या हेल्पलाइन वर कॉल करून किंवा तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला भेट देऊन नोंदवले जाऊ शकतात, असेही त्यांनी नमूद केले आहे. 

 


Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image