महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेल तर्फे महेंद्रशेठ घरत यांचा सत्कार.!

 महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेल तर्फे महेंद्रशेठ घरत यांचा सत्कार.!



उरण दि २२(विठ्ठल ममताबादे )
दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे अध्यक्ष श्री. भानुदास माळी साहेब यांना तब्बल २५ लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ गाडी भेट दिली. जिल्हाध्यक्ष यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करण्यासाठी ओबीसी सेलच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकी प्रसंगी ओबीसी सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष अजय सिंग यादव, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या शुभहस्ते तर खासदार राहुल गांधी यांचे सल्लागार के. आर. राजू व प्रदेश ओबीसी सेलचे अध्यक्ष भानुदास माळी यांच्या उपस्थितीत महेंद्रशेठ घरत यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सर्वांनी रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या दातृत्वाचे कौतुक केले. यावेळी ओबीसी विभागाचे महाराष्ट्रातील पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image