वार्षिक क्रीडा स्पर्धांचे प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : महात्मा ज्योतिबा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यांनी उपस्थित स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.