कोण पटकावणार बहुमानाचा अटल करंडक; महाराष्ट्राची उत्सुकता शिगेला; विजेत्या एकांकिकेला मिळणार ०१ लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक

कोण पटकावणार बहुमानाचा अटल करंडक; महाराष्ट्राची उत्सुकता शिगेला; विजेत्या एकांकिकेला मिळणार ०१ लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक 


ज्येष्ठ रंगकर्मी सतीश पुळेकर यांचा "गौरव रंगभूमीचा" पुरस्काराने होणार सन्मान


पनवेल(प्रतिनिधी) एकाहून एक अशा सरस अशा एकांकिका सादर होत असल्याने यंदाचा बहुमानाचा अटल करंडक कोण पटकावणार? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. निमित्त आहे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये सुरु असलेल्या ११ व्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे.  

          शुक्रवारपासून सुरु झालेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत राज्यातून निवड झालेल्या २५ एकांकिकांचे सादरीकरण होत आहेत. त्यामध्ये एकांकिकांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. उत्कृष्ट आयोजन व नियोजन, भरघोस रक्कमेचे पारितोषिके, ज्येष्ठ कलाकारांचे मार्गदर्शन आणि संधी यांचे मिलाप असलेल्या या स्पर्धेतून आजवर अनेक कलाकार घडले आहेत. नाटय चळवळ वॄद्धींगत व्हावी व नाटय रसिकांना आपले नाटयाविष्कार प्रदर्शित करता यावेत्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावेतसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वॄद्धींगत व्हावायासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूरमहापालिकेचे माजी सभागृहनेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी अटल करंडक एकांकीका’ या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंतउमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व निटनेटके संयोजनआकर्षक पारितोषिकेदर्जेदार परिक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाट्य रसिकांच्या गळयातील ताईत बनली. दरवर्षी या स्पर्धेला राज्यातील कलाकार आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत असतो. त्यामुळे हि स्पर्धा राज्यात नावाजली असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना यंदाही भरघोस रक्कमेची पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे प्रायोजक ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लिमिटेड तर सहप्रायोजक नील ग्रुप आणि स्थळ प्रायोजक पनवेल महानगरपालिका आहे.  

        या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार दिनांक १२ जानेवारीला सायंकाळी ०७ वाजता स्पर्धा स्थळ ठिकाणी अर्थात आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यात ज्येष्ठ रंगकर्मी सतीश पुळेकर यांचा "गौरव रंगभूमीचा" पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांची सन्माननीय तर सुप्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या मोने, सुप्रसिद्ध दिग्दर्शक देवेंद्र पेम, विराजस कुलकर्णी, सुप्रसिद्ध अभिनेता जयवंत वाडकर, सुप्रसिद्ध नाट्य निर्मात्या कल्पना कोठारी, अटल करंडक ब्रँड अँम्बेसिडर सुप्रसिद्ध अभिनेत्री रुचिरा जाधव, सुप्रसिद्ध अभिनेता भरत सावले यांची उपस्थिती असणार आहे. या महाअंतिम फेरीच्या अनुषंगाने नाट्य एकांकिकांचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील आणि टीम अटल करंडक यांनी केले आहे. 

       अंतिम फेरीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच पारितोषिक वितरणाच्या दिवशी सकाळी ९ वाजल्यापासून उर्वरित एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे. त्यामध्ये गोंद्या आणि कमुचा फार्स (रंगशाळा जळगाव), जापसाल (उगवाई कलारंग फोंडाघाट कणकवली), आविघ्नेया (सिडेनहॅम कॉलेज मुंबई ), बॉईल्ड- शुद्ध शाकाहारी (कलादर्शन व नाट्यशृंगार पुणे), बॉडी ऑफ नरेवाडी (फितूर थिएटर्स सोसायटी, संत झेवियर कॉलेज मुंबई), पाटी (एकदम कडक नाट्यसंस्था मुंबई) आणि वेदना सातारकर हजर सर (सी. के. ठाकूर स्वायत्त महाविद्यालय पनवेल) या एकांकिकांचा समावेश आहे. त्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे.  



Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image