कळंबोलीमध्ये शेकापला जोरदार झटका; शहर संघटक विजय गर्जे भाजपात
पनवेल (प्रतिनिधी) शेतकरी कामगार पक्षाला कळंबोलीमध्ये जोरदार धक्का बसला असून शेकापचे शहर संघटक विजय गर्जे यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहिर पक्ष प्रवेश केला. पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक बबन मुकादम आणि भाजपचे भटके विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष प्रवेश झाला. या सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत करुन त्यांनी जो विश्वास ठेऊन पक्षप्रवेश केला आहे तो सार्थ ठरेल अशी ग्वाही प्रवेशकर्त्यांना दिली.
पनवेल महापालिका क्षेत्रासह संपुर्ण तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे तसेच नागरीकांना भेडसवणाऱ्या समस्या मार्गी लागत आहेत. त्यांच्या या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन शेकापचे कळंबोली शहर संघटक विजय गर्जे यांच्यासह शुभम पाटील, दिनेश निशाद, धवल भट्ट, सद्दाम शेख, अनीश सिंग, मनींदर सिंग, मनमीत संगेरा, अरनेश मेदी, साहिल पवार, आमीर खान, जतीनंदर सिंग, अमरितपाल सिंग, शुभम विश्वकर्मा, संजय माने, प्रफुल्ल शिंदे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पनवेल येथील निवसस्थानी झालेल्या या पक्षप्रवेशावेळी माजी नगरसेवक बबन मुकादम, भाजपचे भटके विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, भाजपचे उत्तर रायगड उपाध्यक्षा प्रिया मुकादम, आदिनाथ जायभाये, लक्ष्मण जायभाय, दिनकर बडे, भाजपचे कळंबोली शहर चिटणीस मनीष तिवारी, मन्सूर पटेल आदी उपस्थित होते.