चिपळे ते हरिग्राम रस्त्यावर लाईट पोल बसवण्याची जागृती फाऊंडेशन चे मागणी

 चिपळे ते हरिग्राम रस्त्यावर लाईट पोल बसवण्याची जागृती फाऊंडेशन चे मागणी


पनवेल दि. ३ प्रतिनिधी

पनवेल तालुक्यातील चिपळे ते स्वप्ननगरी हरिग्राम केवाले ,वाकडी या गावांमधील लोकवस्ती वाढली आहे  शहराच्या जवळच असलेल्या गावा गावात लोकसंक्या वाढली आहे त्यामुळे शिक्षणासाठी व्यवसायासाठी ,नोकरीसाठी या गावांमधून अनेक महिला ,तरुणी शहरात येत असतात मात्र अंधार झाल्यावर  घरी जाताना रस्त्यावर  लाईट व्यवस्था ,पथदिवे  नसल्याने महिला वर्ग भीतीमय वातावरणात घरी जात असल्याचे निदर्शनास येत आहे . कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये याकरिता या मार्गावर महिलांच्या सुरक्षितेच्या दुर्ष्टीने  पथदिवे बसवण्यात यावी अशी मागणी जागृती फाऊंडेशन चे अध्यक्ष निलेश सोनावणे ,हरिग्राम ,नेरे, दुन्द्रे विभागीय अध्यक्ष  एडवोकेट रुपेश जोशी यांनी महावितरण कडे  केली आहे .
पनवेल तालुक्यात अनेक नवीन नवीन प्रकल्प  येत आहेत,आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेल चे नाव जगाच्या नकाशावर झळकत आहे त्यामुळे येथे नागरीकरण वाढले आहे .शहरातील घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या अवय बाहेर गेल्याने शहराला लागून असलेल्या दोन ते पाच किलोमीटर परिसरात वसाहती निर्माण होत आहेत बहुतांश नोकरदार वर्ग असल्याने त्यात देखील महिला ,विध्यार्थींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.शिक्षणाकरिता व नोकरीकरिता ,काही कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांना रात्री घरी जाताना उशीर झाल्यास अंधारातून जावे लागते त्यामुळे चिपळे पूल ते हरिग्राम गावापर्यंत पथदिवे बसवण्याची मागणी महावितरण कडे जागृती फाऊंडेशन ने केली आहे .  
 

Popular posts
२२ एप्रिल रोजी शेलघर येथे काँग्रेसची आढावा बैठक.;सर्वच पदाधिकाऱ्यांना मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे महेंद्रशेठ घरत यांचे आवाहन
Image
रोटरी क्लब ऑफ खारघर मिडटाऊनचे खारघर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डायलिसिस सेंटरचे उदघाटन
Image
दिल्ली दरबारी महेंद्रशेठ घरत यांची तोफ धडाडली-काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महेंद्रशेठ घरत यांचे केले कौतुक
Image
महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडेंचा जगदीश गायकवाड यांच्या निवासस्थानी जाहीर सत्कार
Image
कु.देवश्री प्रशांत शेडगे हिचा विदेशात डंका; कॉम्प्युटर क्राऊड मद्धे मास्टर करून पनवेल च्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा
Image