रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न   



पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचा प्रगतीचा आलेख क्षितीजाच्या पलीकडे गेला आहे असे गौरवोद्गार संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वार्षिक स्नेहसंमेलानवेळी काढले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय सचिव ज्योत्स्ना शिंदे-पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. 

       खारघर येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या या विद्यालयात 'क्षितिज-एक नये संकल्प के साथ' या थीम अंतर्गत विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी त्यांचे नृत्याविष्कार सादर केले. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. 

         या कार्यक्रमाला संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, संस्थेचे सदस्य तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, संचालक संजय भगत, माजी नगरसेविका अनिता पाटील, भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, किरण पाटील, शहर सरचिटणीस दीपक शिंदे, स्कूल कमिटी मेंबर प्रभाकर जोशी, प्राचार्या निशा नायर, ओवेपेठ येथील रामशेठ ठाकूर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष खांदेकर, सहाय्यक शिक्षिका नमिता आखुरी, खुशबू भोसले, सहायक शिक्षक नंदकुमार भोईर यांच्यासह मान्यवर मान्यवर उपस्थित होते.




Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image