नमुंमपा मुख्यालयात राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांना जयंतीदिनी अभिवादन
नमुंमपा मुख्यालयात राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांना जयंतीदिनी अभिवादन
नमुंमपा मुख्यालयात राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांना जयंतीदिनी अभिवादन
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती यानिमित्त मुख्यालयातील ॲम्फीथिएटर येथे समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे यांच्या हस्ते, इतर अधिकारी – कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन संपन्न झाले.
यावेळी महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ सभागृहाबाहेरील राजमाता जिजाऊ माँसाहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासही पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले.