कोल्ड प्ले काॅन्सर्ट' नंतर पहाटे 3 वाजेपर्यंत विशेष स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवित सखोल स्वच्छता

 कोल्ड प्ले काॅन्सर्ट' नंतर पहाटे 3 वाजेपर्यंत विशेष स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवित सखोल स्वच्छता



*एवढा मोठा कार्यक्रम होऊनही सकाळी स्वच्छ रस्ते व परिसर पाहून नागरिकांकडून स्वच्छता कार्याची प्रशंसा*    

          नेरूळ येथे 18, 19 व 21 जानेवारी रोजी संपन्न होत असलेल्या 'कोल्ड प्ले' हा आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय संगीतमय कार्यक्रम बघण्यासाठी देशातून व जगभरातून मोठ्या संख्येने संगीत रसिकांची उपस्थिती असणार हे लक्षात घेत नवी मुंबईच्या स्वच्छ शहर लौकिकाला बाधा पोहोचू नये अशा रितीने हा कार्यक्रम 'शून्य कचरा कार्यक्रम (Zero Waste Event)' स्वरूपात साजरा व्हावा याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सूक्ष्म नियोजन करण्यात आले होते.
          त्या नियोजनानुसार कार्यक्रम स्थळाच्या अंतर्गत भागात कार्यक्रम संध्याकाळचा असला तरी दुपारी 2 वाजल्यापासून 150 हून अधिक परिसर सखींच्या सहयोगाने कचऱ्याचे वर्गीकरण सुरू ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे 10 वाजता कार्यक्रम संपल्यानंतर अतिरिक्त आयुक्त श्री सुनील पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे परिमंडळ 1 उपायुक्त डॉ.अजय गडदे यांच्या माध्यमातून, नेरूळ, बेलापूर, वाशी, तुर्भे विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या सहयोगाने स्वच्छता समुहांच्या वतीने कार्यक्रम स्थळाचा परिसर व कार्यक्रम स्थळाच्या परिसरातील मुख्य रस्ते यांची सखोल स्वच्छता मोहीम लगेचच हाती घेण्यात आली.
          पहाटे 3 वाजेपर्यंत 100 हून अधिक स्वच्छतामित्रांच्या समर्पित सहयोगाने हा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. 75 हजारहून अधिक लोकांच्या उपस्थितीत झालेला हा बिग इव्हेंट असूनही असूनही सकाळी कार्यक्रम स्थळाच्या परिसरातील रस्ते स्वच्छ पाहून जॉगिंगला तसेच सकाळीच फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या नवी मुंबईकर नागरिकांनी महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे व स्वच्छताकर्मींच्या स्वच्छतेप्रती समर्पित कार्याचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे. अशाच प्रकारचे स्वच्छतेप्रती सेवाभावी योगदान व जागरूकता नवी मुंबईला स्वच्छतेमध्ये देशात पुढे ठेवण्यासाठी मोलाची ठरते असेही अभिप्राय नागरिकांकडून व्यक्त करण्यात आले.
          कार्यक्रम झाल्यानंतर साधारणत: 11 वाजल्यापासून पहाटे 3 वाजेपर्यंत शंभर स्वच्छतामित्रांच्या समूहाने 'सखोल स्वच्छता' अर्थात 'डीप क्लीनिंग' करण्यास सुरुवात केली. कार्यक्रम स्थळाभोवतालचा परिसर स्वच्छ करण्यासोबतच भीमाशंकर समोरील पार्किंग ते एलपी पर्यंतचा सर्विस रोड, एलपी रोड ते एसआयईएस कॉलेज, एसआयईएस कॉलेज ते शनी मंदिर रोड अशाप्रकारे कार्यक्रम स्थळाच्या भोवतालचे सर्व मुख्य रस्ते सखोल स्वच्छता मोहीम राबवित स्वच्छ करण्यात आले. या ठिकाणची कचरा वाहतूक करण्यासाठी मोहिमेमध्ये दहा कचरा संकलन वाहने अथक कार्यरत होती. तसेच या रस्त्यांवरील लिटर्स बिन स्वच्छ करण्यासाठी दिवसभर कचरागाड्या फिरत होत्याच.
          काल 18 जानेवारी रोजी कार्यक्रम जरी संध्याकाळी असला तरी दुपारी 2 वाजल्यापासूनच स्टेडियमच्या अंतर्गत भागात शून्य कचरा कार्यक्रमांतर्गत स्वच्छ भारत मिशनच्या प्रमाण कार्यप्रणालीनुसार 150 हून अधिक परिसर सखी आतील कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी कार्यरत होत्या. त्या ठिकाणी जमा झालेल्या प्लास्टिक बॉटल्सचे रिसायकलिंग करण्यासाठी बिसलेरी कंपनीच्या वतीने त्या उचलून नेण्यात आल्या. या ठिकाणचा वर्गीकृत कचरा लगेचच कचरा गाड्यांतून वाहून नेण्यात आला.
          कार्यक्रमाच्या वेळी अशा प्रकारचे नियोजन करण्यासोबतच कार्यक्रम झाल्यानंतरही कार्यक्रम स्थळ व परिसर नीटनेटका करण्यासाठी विशेष स्वच्छता पथक नियुक्त करून सखोल स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यात आली. अशाच प्रकारच्या सखोल स्वच्छता मोहीमा कोल्ड प्ले कॉन्सर्टच्या दिवशी 22 जानेवारीपर्यंत अशाच प्रभावीपणे राबविल्या जाणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छतेप्रती असलेल्या या समर्पित उपक्रमाची नोंद नागरिकांनी तर घेतलीच त्यासोबतच नवी मुंबईचा स्वच्छतेसाठी पुढाकार राष्ट्रीय पातळीवरही नोंदविला जात आहे. 

Popular posts
शंकर वायदंडे संपादित "रायगड सम्राट" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते संपन्न
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
*शासनाच्या अधिकृत बातम्यांसाठी सोशल मीडियाच्या विविध अकाऊंटस् ना भेट देण्याचे जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन*
पनवेलमध्ये 'दिवाळी पहाट'ने सजली दीपावली; राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल स्वराची बरसात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ‘दैनिक किल्ले रायगड’च्या ५९ व्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन
Image