नौदलाच्या माजी सैनिकांचा मेळावा ३० डिसेंबर रोजी चिपळूणमध्ये

 नौदलाच्या माजी सैनिकांचा मेळावा ३० डिसेंबर रोजी चिपळूणमध्ये


रत्नागिरी, दि. २० (जिमाका) : नौदलाच्या माजी सैनिकांचा भव्य मेळावा सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे सोमवार दि. ३० डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वा. पर्यंत करण्यात आले आहे. तरी जिल्हयातील नौदल माजी सैनिक, वीर नारी, वीर माता-पिता यांनी सदर मेळाव्यात अडी-अडचणी सोडविण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे जिल्ह्यामधील फक्त नौदल माजी सैनिक, वीर नारी, वीर माता-पितांसाठी आय. एन. एस. हमला, मोर्वे, मालाड, मुंबई यांच्या तर्फे सोमवार दि.३० डिसेंबर  २०२४ रोजी सकाळी १० वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात पेन्शन विषयक, मेडिकल व स्पर्श (SPARSH) विषयक व इतर अभिलेख विषयक अडचणी असल्यास या मेळाव्यात सहभागी होऊन आपल्या अडी-अडचणींचे निरसन करु शकता. त्याकरीता आपल्या सोबत पीपीओ, आधार कार्ड, बँकेचे पासबुक व सोबत आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल असणे आवश्यक आहे. तसेच डिर्स्चाज बुक, PART II ORDER च्या कॉपी (असल्यास), पॅन कार्ड, ईसीएचएस कार्ड, कॅन्टीन कार्ड, माजी सैनिक ओळखपत्र, इत्यादी घेऊन सदर मेळाव्यात उपस्थित रहावे.

Popular posts
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image