बबनदादा पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचे उदघाटन

 बबनदादा पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचे उदघाटन

पनवेल दि.०९ (प्रतिनिधी) : तळोजा येथील कमलगौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या बबनदादा पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचे उदघाटन आज एमजीएम हॉस्पिटलचे चेअरमन डॉ सुधीर कदम यांच्या हस्ते करण्यात आलॆ. बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. 

             या कार्यक्रमाला पनवेलचे सुप्रसिद्ध डॉ गिरीश गुणे, कळंबोली येथील सत्यम हॉस्पिटलचे डॉ हिमा बरनवाल, नोबल केअर हॉस्पिटलचे डॉ खालिद देशमुख, तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चेअरमन बबनदादा पाटील, ट्रस्टी व शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, ट्रस्टी बाळा मुंबईकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन सोहळा पार पडला. याप्रसंगी बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या प्राचार्य, एलएलएमचे हेड डॉ नाईक, प्रा वैशाली, बी. फार्मसी कॉलेजच्या प्राचार्य डॉ मिताली पाटील, डी फार्मसी कॉलेजच्या प्राचार्य डॉ अर्चना हिवसे, माजी प्राचार्य काकेकर, एस व्ही कॉलेजचे प्राचार्य डॉ राहुल कांबळे, दि इलाईट पब्लिक स्कूलच्या प्राचार्य अलका मॅडम, इलाईट ज्यू कॉलेजच्या प्राचार्य राणे, काईनाथ कमळू पाटील हायस्कुलचे मुख्याध्यपक बोराटे, बी के पाटील कॉलेजचे प्राचार्य निलेश गोंधळी, ए.बी.पाटील माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सिद्धार्थ गोडबोले व इतर शिक्षक, सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Popular posts
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
कामोठे पोलिसांच्या तपासावर आम्हाला पूर्ण विश्वास, आरोपी चा शोध हे लावतीलच - दिघे कुटुंबिय
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image