विख्यात शास्त्रीय व भजन गायक ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचा सहस्रचंद्र सोहळा

विख्यात शास्त्रीय व भजन गायक ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचा सहस्रचंद्र सोहळा 




पनवेल (प्रतिनिधी) बालयोगी श्री. सदानंद महाराज आश्रम संस्थेच्यावतीने रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील नादब्रम्ह साधना मंडळाचे संस्थापक तथा विख्यात शास्त्रीय व भजन गायक ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचा सहस्रचंद्र सोहळा गुरुवार दिनांक ५ डिसेंबर रोजी दुपारी ३. ३० वाजता ठाणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गणेशपुरी येथे आयोजित करण्यात आला आहे. 
         नवी, मुंबई, रायगड, ठाणे, मुंबई तसेच राज्यातील परिसरात ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांनी शास्त्रीय संगीत व भजन संगीतच्या प्रचार व प्रसारासाठी अपार मेहनत घेतली आहे. ६० वर्षेहून अधिक काळ त्यांनी या क्षेत्राची सेवा केली आहे. त्यांनी या क्षेत्रातून अनेक हजारो शिष्य घडविले आहेत. त्यांच्या या शिकवणीतून तयार झालेल्या कलाकारांनी आपले नाव उंचावले आहे. ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचे संगीत क्षेत्रातील कार्य समाजाला नेहमी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरले आहे. त्या अनुषंगाने त्यांचा ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचा सहस्रचंद्र सोहळा बालयोगी श्री. सदानंद महाराज आश्रम संस्थेच्यावतीने होणार आहे. 

Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image