ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांचा शेकाप मध्ये प्रवेश

 ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांचा शेकाप मध्ये प्रवेश


उरण : उरण विधानसभेचे लोकप्रिय उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक ठिकाणचे कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश करत आहेत. आसरे ग्रामपंचायत हद्दीतील धारणेवाडी आणि लोहपवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य यशवंत वाघे आणि ग्रामपंचायत सदस्य वामन वाघे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायणशेठ घरत यांनी त्यांचे स्वागत केले.

       शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करणाऱ्यांचा ओघ वाढत चालला आहे. धारणी वाडी, आणि लोहपवाडी येथील आकाश वाघे, योगेश मुकणे, दीपक वाघे, संतोष पवार, करण वाघे, रमेश पवार, अविनाश पवार, संजय पवार, महेश वाघमारे, राजा वाघे, विजय वाघे, आकाश वाघे, निलेश वाघे, किसन पवार, कैलास पवार, मधुकर वाघे, पांडुरंग वाघे, अमित वाघे, अक्षय शिरसागर यांच्यासह अनेकांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला.