करंजा मच्छिमार बंदर एक अहंकाराची वांझोटी हाक..!!
उरण : करंजा बंदर गेल्या कित्येक दशकांपासून कोळी समाजाचे एक स्वप्न की आपल्या गावात एक विकसित मत्स्य बंदर झाले पाहिजे. शरद पवार हे केंद्रात कृषी मंत्री असताना त्यांनी ह्या बंदराचा आराखडा तयार केला होता. त्यास मुख्य कारण म्हणजे माजी राज्यमंत्री श्रीम. मीनाक्षी ताई पाटील ह्यांचा सततचा पाठपुरावा सन २००९ ला ह्या बंदराचा परिपूर्ण अभ्यास सीआईसीएफ बँगलोर ह्या संस्थेने करून त्याचा तांत्रिक नकाशा सहित प्रस्ताव केंद्रीय कृषी मंत्रालयाला पाठविला. परंतु अचानक असे काय घडले की, ह्या बंदराच्या जागी कडक कातळ ( खडक) लागला जेणेकरून ग्रेजिंग करण्याची आवश्यकता लागली. तेव्हा हेच काम ६८ कोटी वरून १४९ कोटी इतके झाले. तेव्हाच एका लबाड व धूर्त माणसाला ह्याचा वास आला , आणि गावातील साद्या भोळ्या भाबड्या लोकांना त्यांच्या भावनांशी खेळून आपला राजकीय व व्यवसायिक स्वार्थ साधण्यासाठी कोळी समाज हाताशी धरून केंद्रात आपल्या मर्जीची माणसे आहेत ह्याचा फायदा घेऊन सदर चे बंदर मीच आणले आहे ह्या लोभाने कंत्राटदाराला हाताशी धरून व गावातील प्रतिष्ठित व सोसायटीच्या लोकांना सोबत घेवून स्वतःच्या फायद्यासाठी श्री देवेंद्र जी फडणवीस सरकारच्या कार्यकाळात आपले मलिद्याच्ये भागीदार तत्कालीन वित्त व नियोजन मंत्री तथा वन मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समवेत सह्याद्री अतिथी गृहात बैठक घेऊन ती सुद्धा तत्कालीन मत्स्य व्यवसाय मंत्री श्री महादेव जानकर ह्यांना न घेता बेकायदेशीर रित्या महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन सदर बंदराची दिशा व आकृती एका दिवसात केंद्र सरकारला विश्वासात न घेता बदली.