पनवेलकरांची सेवा लेखणीतून घडो : रामदास शेवाळे रायगड दर्पणच्या दिपावली विशेषांकाचे प्रकाशन

पनवेलकरांची सेवा लेखणीतून घडो : रामदास शेवाळे  रायगड दर्पणच्या दिपावली विशेषांकाचे प्रकाशन


पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः समाजातील अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून होत असते. रायगड दर्पणही आपल्या लेखणीतून अशा विविध प्रश्नांना वाचा फोडत असते. पनवेल मधील नागरिकांची सेवा त्यांच्या लेखणीतून कायम घडत राहो असे उदगार शिवसेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा धर्मवीर वाहतुक सेनेचे रामदास शेवाळे यांनी काढले. त्यांच्या हस्ते साप्ताहिक रायगड दर्पणच्या कार्यालयात दिपावली विशेषांकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. दैनिक वादळवारा चे संपादक जेष्ठ पत्रकार विजय कडू, जेष्ठ पत्रकार संजय कदम, पत्रकार मित्र असोसिएशनचे संस्थापक केवल महाडिक, रायगड दर्पणचे संपादक संदीप मुळीक, प्रकाशक डॉन एन. के. के.,‍शिवसेना शहर संघटक आनंदा माने, ट्रान्सपोर्टर राहुल धुमाळ, पत्रकार विशाल सावंत,  अनिल वाघमारे, अनुराग वाघचौरे उपस्थित होते. संपादक संदीप मुळीक यांनी दिपावली अंकातील विशेषत: आणि त्यात वाचक, जाहीरातदारांचा मिळालेला प्रतिसाद याबददल प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रकाशक डॉन एन.के. के. यांनी प्रास्ताविक केले. उपस्थितांनी रायगड दर्पणच्या दिवाळी अंकास शुभेच्छा दिल्या.


Popular posts
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
यूथ महाराष्ट्र संपादिका दिपालीताई पारसकर यांचा वाढदिवस साजरा – सामाजिक उपक्रमातून अनोखा आदर्श
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image