शेतकरी कामगार पक्षात पक्षप्रवेशाची लाट, प्रीतम म्हात्रे यांचा जलवा

 शेतकरी कामगार पक्षात पक्षप्रवेशाची लाट, प्रीतम म्हात्रे यांचा जलवा 


उरण : प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकापमध्ये पक्षप्रवेशाची लाट उसळली आहे. चौक जवळील तीनघर येथील तरुणांनी शिवसेनेतून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. प्रणित जाधव, प्रतीक धानिवले, हर्ष मोरे, रोहित गरुडे, राजेश पाटील यांनी शेकापमध्ये जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायणशेठ घरत, जे एम म्हात्रे इन्फ्रा प्रोजेक्टचे संचालक विपुल म्हात्रे, शेकापक्षाचे पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र पाटील, सावळे विभाग अध्यक्ष भास्कर गाताडे, शेकाप कार्यकर्ते विलास गवंडी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

          शेतकरी कामगार पक्षामध्ये पक्षप्रवेशाची लाट उसळली असून प्रीतम म्हात्रे यांनी आपला जलवा दाखवला आहे. शेकाप मध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. केळवणे जिल्हा परिषद मतदार संघातील जांभिवली ग्रामपंचायत मधील कराडे बुद्रुक येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य वेदिका विनोद जाईलकर त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा सरचिटणीस विनोद अरविंद जाईलकर, भारतीय जनता पार्टीचे माजी ग्रामपंचायत सदस्य विलास बाळकृष्ण शिर्के, युवा कार्यकर्ते गणेश मापनकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बुधवारी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या 
 समितीचे सदस्य आणि ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायणशेठ घरत, पुरोगामी व संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष देवेंद्र पाटील, सरपंच, ज्ञानेश्वर कोंडीलकर, कर्नाळा ग्रामपंचायतचे सरपंच साबीर दळवी, विकास रायकर माजी उपसरपंच, कृष्णा शिर्के इत्यादी मान्यवर उपस्थित होते.  वाशिवली (वडगाव) येथील विजय अनंत शिंदे, रमेश रामचंद्र भोईर, ज्ञानेश चंद्रकांत शिंदे, अनंत नथू शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला.
Popular posts
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकातून सौर-ट्री प्रकल्पांना गती
Image
हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप
Image