प्रितम म्हात्रे यांना उरणमध्ये आम आदमी पार्टीचा पाठिंबा

 प्रितम म्हात्रे यांना उरणमध्ये आम आदमी पार्टीचा पाठिंबा


पनवेल : शेतकरी कामगार पक्षाचे उरण विधानसभेचे उमेदवार प्रितम म्हात्रे यांना आम आदमी पार्टीने जाहीर पाठिंबा दिला आहे. प्रितम म्हात्रे यांना विविध पक्षांचा व संघटनांचा पाठिंबा मिळत असल्याने त्यांची ताकद वाढली आहे.

      आम आदमी पार्टी तर्फे महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2024 रायगड जिल्हा करता महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिला असल्याचे पत्र डाॅ. रियाझ पठाण - प्रदेश संघटन मंत्री - महाराष्ट्र राज्य, यांनी दिला आहे. यावेळी आपच्या कार्यकर्त्यांसह अनेक जण उपस्थित होते. उरण विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षातर्फे प्रीतम म्हात्रे हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. अनेक पक्ष आणि संघटना, संस्था  यांनी प्रीतम म्हात्रे यांना पाठिंबा दिला आहे. (फोटो)