आपण न केलेल्या कामाचे श्रेय घ्यायची पण याना लाज वाटत नाही-प्रितम म्हात्रे यांचा घणाघात
उरण : 190 उरण विधानसभा मतदार संघात गेल्या पाच वर्षात काडीचेही काम झाले नाही त्यामुळे विकासाची वाट पाहणाऱ्या उरणच्या जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे उरण तालुक्याचा हा मागे पडलेला विकासाचा अनुशेष भरून काढून तरूणाना इथेच सन्मानजनक रोजगार मिळवून देण्याचा प्रितमदादा म्हाञे यांचा मानस आहे. त्यासाठी आपण येत्या 20 तारखेला प्रितम दादाना प्रचंड मतानी निवडून देवून तालुक्याला लागलेला कलंक धुवून काढा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यानी दादरपाडा येथे भव्य रॅलीला मार्गदर्शन करताना केले.