ऑल इंडिया पॅंथर सेना आणि चर्मकार समाज प्रबोधन समितीचा प्रीतम म्हात्रे यांना पाठिंबा

 ऑल इंडिया पॅंथर सेना आणि चर्मकार समाज प्रबोधन समितीचा प्रीतम म्हात्रे यांना पाठिंबा 


उरण : ऑल इंडिया पॅंथर सेना आणि चर्मकार समाज प्रबोधन समितीने शेतकरी कामगार पक्षाचे उरण विधानसभेचे उमेदवार प्रीतम जे एम म्हत्रे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. पाठिंब्याचे पत्र देऊन प्रीतम जे एम म्हात्रे यांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले आहे. 

     उरण विधानसभा मतदारसंघातून प्रीतम जे एम म्हात्रे यांना निवडून आणण्यासाठी उरण, रसायनी, चौक, खालापूर मधील कार्यकर्ते बिनशर्त पाठिंबा देत आहेत. ऑल इंडिया पॅंथर सेना रायगड जिल्हा उरण, पनवेल, खालापूर तालुक्यातील गाव- शहरी भागात आहे. ऑल इंडिया पॅंथर सेनेचे पनवेल तालुका अध्यक्ष दयानंद सरवदे, रसायन अध्यक्ष राजू साळवे, रसायनी महिला अध्यक्ष अपेक्षा गायकवाड यांनी प्रीतम म्हात्रे यांना पाठिंबा दिला आहे. चर्मकार समाज प्रबोधन समिती उरण अध्यक्ष रवींद्र पांडुरंग चव्हाण यांनी देखील  प्रीतम जे एम म्हात्रे यांना पाठिंबा दिला आहे. प्रीतम जे एम म्हात्रे यांना विजयी करण्यासाठी विविध संस्था, संघटना, पक्ष यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे प्रीतम जे एम म्हात्रे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.