प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन

 प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन 


उरण : महाविकास आघाडी, इंडिया अलायन्स पुरस्कृत भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे उरण विधानसभेचे उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या प्रचारार्थ 16 नोव्हेंबर रोजी उलवे नोड, प्लॉट नंबर 69 ,सेक्टर 5 येथील मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.

          उरण विधानसभा मतदारसंघातून मतदारांनी प्रीतम जे एम म्हात्रे यांना आमदार करण्याचे ठरवले आहे. प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या प्रचारार्थ 16 नोव्हेंबर रोजी उलवे नोड येथे सभेचे आयोजन करण्यात आलेले असून विविध वक्ते यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करणार आहेत. प्रीतम म्हात्रे यांना प्रचार रॅली दरम्यान नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. अवघी तरुणाई सह लहान मुले देखील प्रीतम म्हात्रे यांना पाठिंबा देत आहेत. प्रीतम म्हात्रे यांच्या नावाचा संपूर्ण उरण परिसरात बोलबाला झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे प्रीतम जे एम म्हात्रे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. या सभेला नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.