कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या पाठपुराव्याला यश;उलवे नोड मधील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती

कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या पाठपुराव्याला यश;उलवे नोड मधील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती




उरण दि ६(विठ्ठल ममताबादे )
गणेशोत्सव दोन दिवसांवर येवून ठेपला असताना उलवे नोड मधील दुरावस्था झालेल्या रस्त्यांची पाहणी सिडको अधिकाऱ्यांसोबत कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केली होती व तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी असा आग्रह सिडको अधिकाऱ्यांकडे धरला होता. त्याला यश येवून सिडको कडून उलवेनोड मधील खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात आली. कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या पाठपुराव्याने तत्परतेने रस्त्यांची दुरुस्ती झाल्यामुळे ग्रामस्थानी  समाधान व्यक्त केला.रस्ते दुरुस्ती मुळे गणेश भक्तांचा प्रवास आता सुरक्षित व आनंददायी होणार आहे.