रयत शिक्षण संस्थेच्या वतीने रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत व त्यांच्या सौभाग्यवती शुभांगीताई महेंद्रशेठ घरत यांचा विशेष सत्कार

रयत शिक्षण संस्थेच्या वतीने रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कामगार  नेते महेंद्रशेठ घरत  व त्यांच्या सौभाग्यवती शुभांगीताई महेंद्रशेठ घरत यांचा विशेष सत्कार



उरण दि २२(विठ्ठल ममताबादे )
रयत शिक्षण संस्थेस रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कामगार  नेते महेंद्रशेठ घरत  व त्यांच्या सौभाग्यवती शुभांगीताई महेंद्रशेठ घरत यांनी ५१ लाख रुपयांची देणगी दिली. त्या बद्दल रयत शिक्षण संस्थेच्या वतीने सातारा येथे रविवार दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १२७ व्या जयंती निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष मा. श्री शरदचंद्रजी पवार यांच्या  शुभहस्ते  त्यांचा कर्मवीर समाधी परिसर सातारा येथे विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर संस्थेचे चेरमन कर्मवीर अण्णांचे नातु डॉ अनिल पाटील ,साताऱ्याचे माजी खासदार श्रीनिवास पाटील ,रायगड चे माजी खासदार रामशेठ ठाकूर  तसेच संस्थेचे देशभरातील पदाधिकारी,शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.