भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी


रत्नागिरी, दि.२० (जिमाका)-  भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना service Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे शासनातर्फे राज्यातील नवयुवक व नवयुवतीसाठी १४ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत SSB कोर्स क्र. 58 आयोजित करण्यात येणार आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते.*

                जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदावर भरती होण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय रत्नागिरी येथे २५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येताना Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील SSB-58 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट व ते पुर्ण भरुन घेवून यावे.  

              एस. एस. बी. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढील नमूद कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना सोबत घेवून यावेत. कंम्बाईड डिफेन्स सव्हींसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अॅकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र असावे. एनसीसी 'C' सर्टिफिकेट 'A' किंवा 'B' ग्रेड मध्ये पास झालेले असावेत.  एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबी साठी शिफारस केलेली असावी.  टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विदयापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एस.एस.बी. साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

                 अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल   आय डी training.pctcnashik@gmail.com व दुरध्वनी क्र. ०२५३-२४५१०३२ किंवा व्हाटसअप क्र. ९१५६०७३३०६ वर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नागिरी यांनी केले आहे.

Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image