सद्भावना दिवस सामुहिक प्रतिज्ञा घेत नमुंमपा मुख्यालयात स्व.राजीव गांधी जयंतीदिनी अभिवादन


 

सद्भावना दिवस सामुहिक प्रतिज्ञा घेत नमुंमपा मुख्यालयात स्व.राजीव गांधी जयंतीदिनी अभिवादन





 

      सद्भावना दिवसानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे सद्भावना प्रतिज्ञा घेत माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या समवेत उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी सद्भावना दिवस प्रतिज्ञा ग्रहण केली.

      “मी अशी प्रतिज्ञा करतो / करते की, मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता, सर्व भारतीय जनतेच भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन. मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो/करते की, आमच्यामधील सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनिमय करून व संविधानिक मार्गाने सोडवीन” – अशा प्रकारची सद्भावना दिवस प्रतिज्ञा मोठ्या संख्येने उपस्थितांनी घेतली.

         यावेळी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.सत्यवान उबाळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, विधी अधिकारी श्री. अभय जाधव, प्रशासकीय अधिकारी श्री.उत्तम खरात, श्री.विलास मलुष्टे, श्री.दत्तात्रेय काळे आणि इतर अधिकारी – कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते