अटल सेतू वर महिलेचा आत्महत्तेचा प्रयत्न;पोलिसांनी वाचविले महिलेचे प्राण

 अटल सेतू वर महिलेचा आत्महत्तेचा प्रयत्न;पोलिसांनी वाचविले महिलेचे प्राण





उरण दि 17(विठ्ठल ममताबादे )
 दिनांक 16/8/2024 रोजी सायंकाळी 19:06 वाजेच्या सुमारास अटल सेतूवर अटल सेतू ब्रिज मुंबईकडून शेलघर टोल नाक्या कडे जाणाऱ्या लेन 12.4 अंतरावर स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH 02 FH 1686 ही रस्त्यात थांबली असून कार मधील एक महिला ब्रिजच्या रेलिंग क्रॉस करून काहीतरी करीत आहे अशी माहिती न्हावा शेवा वाहतूक शाखा पेट्रोलिंगच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळताच  पेट्रोलिंग 1 वाहनावर वर असलेले 1)पोलीस नाईक 3018 ललित शिरसाठ 2) पोलीस नाईक 2322 किरण मात्रे 3) पोलीस शिपाई 4341 यश सोनवणे हे सदर ठिकाणी पोहोचताच महिला नामे रीमा मुकेश पटेल वय 56 वर्ष गृहिणी राहणार मुलुंड मुंबई यांनी ब्रिजवरून उडी घेण्याचा प्रयत्न केला असता सदर पेट्रोलिंग वर कार्यरत असलेले पोलीस अंमलदारांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून कसोशीने प्रयत्न करीत तिला सुरक्षित वर काढले.सर्वप्रथम एका कार ड्रायवरने तिला आत्महत्तेपासून रोखण्याचा प्रयत्न केला. तरीही ती महिला ऐकत नव्हते. मात्र वेळेत वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी दाखल झाल्याने सदर महिलेला पोलिसांनी पुलावरून बाहेर ओढून सुरक्षित स्थळी आणले. व तिचे प्राण वाचवले.
ड्रायवर संजय द्वारका यादव वय 31 वर्षे धंदा टॅक्सी चालक राहणार कोपरी, हेमलता यांची चाळ  ठाणे  या व्यक्तीने सर्वप्रथम त्या महिलेला समुद्रात उडी मारू नये म्हणून पकडून ठेवले. त्यानंतर घटना स्थळी पोलीस दाखल झाले व महिलेचा जीव वाचवला.

कोट (चौकट ):-सदर महिला अगोदर ऐरोली येथे समुद्रात देवाचे फोटो टाकण्यासाठी गेली होती. मात्र तिथे पाणी कमी होते. तिला कोणीतरी सांगितले होते की देवाचे फोटो खोल पाण्यात विसर्जन करावे. त्या अनुषंगाने ती खोल पाण्याचा शोध घेत अटल सेतू वर आली. ती  महिला धार्मिक वृत्तीची असून ती गोंधळलेल्या स्थितीत होती. अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.सदर महिलेला वाचविण्यात यश आले असून ती महिला फोटो टाकण्यासाठी आली होती की आत्महत्त्या करण्यासाठी आली होती याचा अधिक तपास न्हावा शेवा पोलीस स्टेशन करीत आहे 
-अंजुमन बागवान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, न्हावा शेवा.
Popular posts
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
कामोठे पोलिसांच्या तपासावर आम्हाला पूर्ण विश्वास, आरोपी चा शोध हे लावतीलच - दिघे कुटुंबिय
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image