अटल सेतू (MTHL) वरील कामगारांनी स्वीकारले महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व!

 अटल सेतू (MTHL) वरील कामगारांनी स्वीकारले महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व!



उरण दि २६(प्रतिनिधी)-कोकणचा कायापालट करणारा एमएमआरडीए चा महत्वाकांक्षी प्रकल्प, अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू (MTHL)वर सर्वात मोठा टोलनाका शेलघर येथे सुरु करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकल्पात सुमारे दोनशे ते अडीचशे विविध विभागात कामगार काम करत आहेत. हा टोलनाका लवकरच खाजगी कंपनीला चालवायला देण्यात येणार आहे. कामगारांनी आपली नोकरी व पगार साबूत राहावा यासाठी कामगारांचे खंबीर नेतृत्व असलेले कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे सभासदत्व स्विकारले आहे. संघटनेच्या नामफलकाचे अनावरण संघटनेचे अध्यक्ष तथा रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या शुभहस्ते बुधवारी करण्यात आला. यावेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सचिन घरत, उरण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद म्हात्रे, इंटकचे रायगड जिल्हा अध्यक्ष किरीट पाटील, संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील, जासई विभाग अध्यक्ष विनोद पाटील, जासई ग्रा. प. सदस्य आदित्य घरत , संघटक अभिजित घरत, आनंद ठाकूर, अरुण म्हात्रे, तसेच शेकडो कामगार उपस्थित होते.
Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image