“महसूल सप्ताहानिमित्त ”विविध कार्यक्रमांचे आयोजन,नागरिकांनी महसूल सप्ताहाचा लाभ घ्यावा-विभागीय महसूल आयुक्त पी.वेलरासू

“महसूल सप्ताहानिमित्त ”विविध कार्यक्रमांचे आयोजन,नागरिकांनी महसूल सप्ताहाचा लाभ घ्यावा-विभागीय महसूल आयुक्त पी.वेलरासू


नवी मुंबई, दि. 25:- महसूल विभागामार्फत राज्यात 1 ऑगस्ट हा “महसूल दिन” साजरा करण्याबरोबरच 1 ते 7 ऑगस्ट 2024 या कालावधीत “महसूल सप्ताह” साजरा करण्यात येणार आहे. या सात दिवसात कोकणातील प्रत्येक जिल्हयात शासनाने दिलेल्या सूचनांबरोबरच नाविण्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे आवाहन विभागीय महसूल आयुक्त पी.वेलरासू यांनी केले आहेत. 

     या सप्ताहात महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसूल कामे वेळेत पूर्ण करून त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणे, वसूलीच्या नोटीसा पाठवणे, मोजणी करणे इत्यादी कामे वेळापत्रकानुसार करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आणि महसूल उद्दिष्ट पूर्ण  करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी 1 ऑगस्ट रोजी ‘महसूल दिन’ साजरा करण्यात येणार आहे. 

       1ऑगस्ट रोजी “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेच्या प्रचार व प्रसिध्दीने “महसूल दिन” आणि “महसूल सप्ताहाचा” शुभारंभ होणार आहे. 

       2 ऑगस्ट रोजी  “मुख्यमंत्री युवा कार्या प्रशिक्षण”  योजनेतर्गत जास्तीत जास्त युवकांना लाभ मिळवून देण्याकरीता अधिवास  प्रमाणपत्र, आधारकार्ड इत्यादी आवश्यक कागदपत्रे तातडीने उपलब्ध व्हावीत यासाठी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. 

      3 ऑगस्ट रोजी सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन” योजनंतर्गत राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटी/दर्शनाच्या संधीचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, दाखले, प्रमाणपत्रे,तातडीने उपलब्ध व्हावीत यासाठी विशेष शिबारांचे आयोजन करण्यात येणार आहेत.     

     4 ऑगस्ट रोजी “स्वच्छ सुंदर माझं कार्यालय” ही विशेष मोहीम राबवून जिल्हा, तालुका, मंडळ व ग्रामस्तरावरील कार्यालय व परिसरातील स्वच्छता करण्यात येणार आहे. कार्यालयाचे अभिलेख व दस्तऐवज यांचे वर्गिकरण, व्यवस्थापन, संगणकीकरण यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.   

      5 ऑगस्ट रोजी सीमेवर तैनात सैनिक तसेच शहिदांच्या कुटूंबीयांना मदत, त्यांना जमीन वाटप, संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या कार्यक्रमाचे आयोजन. 

      6 ऑगस्ट  रोजी  “एक हात मदतीचा दिव्यांगाचा कल्याणाचा” या उपक्रमातर्गत दिव्यांग व्यक्तींकरीता  शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमाची माहिती तसेच या योजनांचा लाभ घेण्याकरीता आवश्यक असणाऱ्या महसूल विभागांशी संबधित विविध दाखले व प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.     

    विविध योजनांतर्गत दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या लाभांच्या अनुषंगाने जिल्हा, तालुकास्तरावर शिबीर आयोजित करुन स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने उपकरणांचे वाटप करण्यात येणार आहे.

       7 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील जिल्हयात कार्यरत असलेल्या सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित बाबी निकाली काढण्यासाठी ‘महसूल संवर्गातील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 

     महसूल सप्ताहादरम्यान केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेण्यासाठी ‘महसूल सप्ताह सांगता समारंभ’ आयोजित करण्यात आला आहे. 

     या कार्यक्रमांचे नियोजन करून याबाबतची प्रचार व प्रसिद्धी करण्याबरोबरच महसूल विभाग, भूमी अभिलेख आणि नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांच्यामार्फत शासकीय योजनांची माहिती विशद करणाऱ्या लघुचित्रफिती तयार करून विविध प्रसारमाध्यमांमध्ये देण्यात येणार आहेत. याशिवाय प्रत्येक जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयांमध्ये हेल्पडेस्क, हेल्पलाईन तयार करून मदत करण्याकरिता यंत्रणा कक्ष करण्यात येणार आहे. 

                                               

Popular posts
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
यूथ महाराष्ट्र संपादिका दिपालीताई पारसकर यांचा वाढदिवस साजरा – सामाजिक उपक्रमातून अनोखा आदर्श
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image