मासळी विक्रेत्यांची जाणून घेतली व्यथा;कांतीलाल कडू यांनी महापालिका उपयुक्तांकडे मांडली कैफियत

मासळी विक्रेत्यांची जाणून घेतली व्यथा;कांतीलाल कडू यांनी महापालिका उपयुक्तांकडे मांडली कैफियत


पनवेल: क्रीडा मैदानाचे सुशोभीकरण करताना वर्षानुवर्षे मासळी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या स्थानिक विक्रेत्यांना विस्थापित करण्याचा घाट काही राजकीय नेत्यांनी महापालिका प्रशासनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून घातला आहे. त्यामुळे स्थानिकांना देशोधडीला लावणाऱ्या प्रस्थापितांविरोधात सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी रणशिंग फुंकले आहे.

नवीन पनवेल येथील राजीव गांधी मैदानात क्रीडा संकुल उभारण्याचे काम सुरु आहे. परंतु, तेथे वर्षानुवर्षे मासळी विक्रीचा परंपरा गत व्यवसाय करणाऱ्या स्थानिक विक्रेत्याचा जाच सुरु केला आहे. साध्या पावसाळी दिवस सुरु आहेत, त्यात मासळी विक्रेत्यांना पळवून लावण्याचा घाट काही राजकीय नेत्यांनी महापालिका अधिकाऱ्यांमार्फत केला आहे. त्या मासळी बाजारची पाहणी कडू आणि त्यांचे सहकारी अमित चावळे, किरण करावकर, हरेश पाटील यांनी केली. त्यानंतर महापालिका उपायुक्त मारुती गायकवाड यांच्याशी संपर्क साधून तेथील स्वच्छता, औषध फवारणी करण्याची कडू यांनी विनंती केली. तसेच मासळी विक्रेत्यांना हक्काची आणि सोयीची स्वतंत्र व्यवस्था करावी अशी मागणी कडू यांनी गायकवाड यांच्याकडे केली आहे. त्यांनी निश्चित विचार करून पावसाळ्यापर्यंत कोणतीच कारवाई न करण्याचा शब्द दिला आहे. शिवाय कुणीही विस्थापित होवू नये याकडे महापालिकेचा सार्वजनिक कल राहिल, असे त्यांनी सांगितले.
नोंदणीकृत असलेल्या एकविरा मासळी विक्रेत्या संघाचचे सदस्य यावेळी उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या व्यथा आणि अनेक वर्षाच्या विस्थापित होण्याच्या कथाही कडू यांना ऐकविल्या. त्यातून सकारात्मक आणि कायदेशीर मार्ग काढून न्याय देण्याचे आश्वासन कडू यांनी त्यांना दिले.

Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image