बेलापूर विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई
डॉ. राहूल गेठे मा. उप आयुक्त (अतिक्रमण) यांचे आदेशान्वये, श्री. अमोल पालवे, सहा. आयुक्त (मुख्यालय), श्री. शशिकांत तांडेल सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी - बेलापूर, यांचे नियंत्रणाखाली तसेच श्री. मयुरेश पवार, कनिष्ठ अभियंता व श्री. स्वप्निल तारमळे, वरिष्ठ लिपिक/ कर निरिक्षक, श्री. धिरेन भोईर, श्री. नयन भोईर लिपिक, श्री. सागर पाटील, लिपिक यांचे उपस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्लॉट नं- 06, सेक्टर् – 15, बेलापूर, नवी मुंबई येथे अनधिकृत असलेली 02 - नर्सरी, 17-पत्र्याच्या खोल्या, 01- धाबा, 01- भंगारवाला पत्राशेड इत्यादिंवर अे विभाग कार्यालय बेलापूर मार्फत तोडक कारवाईचे आयोजन करुन निष्कासनाची मोहिम राबविण्यात आली.
या धडक मोहिमेसाठी अे विभाग कार्यालय अंतर्गत बेलापूर विभागातील अधिकारी/ कर्मचारी, मजूर- 15, जे.सी.बी-02, पिकअप- 01, आयचर-01 तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस तैनात होते.
यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.