फणसवाडी आदिवासी शाळेत मोफत दप्तर;वह्या वाटप

फणसवाडी आदिवासी शाळेत मोफत दप्तर;वह्या वाटप



पनवेल /प्रतिनिधी

पनवेल  तालुका पत्रकार संघर्ष समिती,जागृती फाउंडेशन व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने  रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा  फणसवाडी  येथे विध्यार्थ्यांना दप्तर .वह्या खाऊ वाटप करण्यात  आले  यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे  अध्यक्ष निलेश सोनावणे ,सचिव शंकर वायदंडे ,जागृती फाऊंडेशन चे  तळोजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे ,सरचिटणीस कुवर पाटील शाळेच्या शिक्षिका कविता सरगर ,नेहा मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते .

      जागृती फाऊंडेशन पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट यांच्या विद्यमाने सामाजिक शैक्षणिक उपक्रम सातत्याने आयोजित केले जातात . शाळा सुरु झाली कि गरीब गरजू विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते या वर्षी देखील आदीवासी फणसवाडी येथील रायगड जिव्हा परिषद शाळेत मोफत साहित्य वाटप केले असल्याचे पनवेल तालुका पत्रकार  संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी सांगितले ,यावेळी पत्रकार दीपाली पारस्कर ,सनिप कलोते, सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील विष्णू भोईर , मनोहर पाटील  आदी मान्यवर उपस्थित होते