पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने एकविरा गडावर स्वच्छता अभियान

पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने एकविरा गडावर स्वच्छता अभियान



लोणावळा(प्रतिनिधी)-दिनांक ३, 

पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने एकविरा गडावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.या ट्रस्टचे अध्यक्ष अरूण जाधव यांच्या प्रयत्नाने बिर्ला कार्बन इंडिया प्रा.लि.व आई एकवीरा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवार दिनांक ३ मे २०२४ रोजी आई एकवीरा गड कार्ला लोणावळा येथे स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले व प्लास्टिक बंदी जनजागृती मोहीमेअंतर्गत भाविकांना कापडी पीशव्यांचे वाटप करण्यात आले.या तिन्ही संस्थाच्या पन्नासच्यावरती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या स्वच्छता अभियानात आपला सहभाग नोंदवीला.

      या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्री अरुण गोविंद जाधव यांनी गडावरती देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भावीकांना स्वच्छतेचे आणि पर्यावरणाचे महत्त्व पटवून दीले. मुंबईवरून या मोहीमेसाठी खास आलेले सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय ओगले तसेच पाली महडचे माजी सरपंच श्री.रवी भोपी,श्री.रोहित इंगळे,श्री.निलेश जाधव,अक्षय सकपाळ यासह अनेक पर्यावरवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सर्वांच्या प्रयत्नातून ही मोहीम यशस्वीपणे संपन्न झाली.

Popular posts
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
कामोठे पोलिसांच्या तपासावर आम्हाला पूर्ण विश्वास, आरोपी चा शोध हे लावतीलच - दिघे कुटुंबिय
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image