खारघर स्पोर्ट्स अॕकॅडेमी व युवा प्रेरणा सामाजिक संस्था यांच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक तसेच क्रीडाविषयक उपक्रमांचे आयोजन


खारघर स्पोर्ट्स अॕकॅडेमी व युवा प्रेरणा सामाजिक संस्था यांच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक तसेच क्रीडाविषयक उपक्रमांचे आयोजन



खारघर (प्रतिनिधी)-  खारघर रायगड जिल्ह्याचे माजी खासदार व दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा वाढदिवस दिनांक 2 जून रोजी असून या निमित्ताने खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने रविवार २ जून रोजी संध्याकाळी ५ वा. भव्य अशा फर्स्ट टॉप रँकिंग ओपन रोड रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप चे आयोजन सेक्टर 14 खारघर गाव मेट्रो स्टेशनच्या बाजूला करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून स्पर्धक सहभागी होणार आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्याच वेळेस खारघर शहरात या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. जवळपास २०० खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत असे खारघर स्पोर्ट्स अकॅडमी चे अध्यक्ष किरण पाटील व प्रशिक्षक (कोच) मोहम्मद सियाद यांनी सांगितले. 

        लोकनेते रामशेठ ठाकूर यांची समाजाप्रती असलेली बांधिलकी व पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना दिलेली शिकवण म्हणजे समाजासाठी काहीतरी उपयुक्त असे कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरा करावा व त्याचाच एक भाग म्हणून खारघर शहरातील नागरिकांना त्यांच्या आधार कार्ड मधील दुरुस्ती, अपडेट असतील तसेच नवजात बालकांसाठी मोफत आधार कार्ड शिबिराचे आयोजन शनिवार व रविवार दिनांक १ व २ जून २०२४ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत. खारघर सेक्टर 19 ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, प्लॉट नंबर 59  या ठिकाणी करण्यात आलेले आहे. शहरातील सर्व नागरिकांनी या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन युवाप्रेरणा सामाजिक संस्थेच्या सचिव व मा.नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी केले आहे.