जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यम कक्षाबाबतचे महत्त्व अधोरेखित करून संबंधित सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना केल्या
ठाणे (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अशोक शिनगारे यांनी जिल्हा माहिती कार्यालयातील कार्यरत ठाणे लोकसभा मतदारसंघांतर्गत "एकत्रित माध्यम समन्वय कक्षाला" (Integrated Media Centre) भेट देऊन तेथील कामकाजाविषयी सविस्तर माहिती जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांच्याकडून जाणून घेतली .
यावेळी त्यांच्यासोबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, तहसिलदार प्रदीप कुडळ, अव्वल कारकून ऋषिकेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी महोदयांनी मीडिया कक्षबाबतचे महत्त्व अधोरेखित करून संबंधित सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचित केले की, प्रसारमाध्यमांमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये प्रशासनाच्या कामकाजाविषयी तसेच ठाणे जिल्हा लोकसभा मतदारसंघांतर्गत असलेल्या कोणत्याही महत्त्वाच्या घडामोडींबाबत त्यांना तातडीने अवगत करावे.