पनवेल महापालिकेच्यावतीने जागतिक हिवताप दिनानिमित्ताने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन


पनवेल महापालिकेच्यावतीने जागतिक हिवताप दिनानिमित्ताने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन



पनवेल,दि.25: दिनांक 25 एप्रिल हा जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभाग ,  घनकचरा व स्वच्छता विभाग यांच्यावतीने आज स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी उपायुक्त डॉ. वैभव विधाते व मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी पशुधन अधिकारी डॉ. भगवान गीते, साथरोग वैद्यकिय अधिकारी डॉ. आकाश ठसाळे, आरोग्य निरीक्षक संजय जाधव, बहुद्देशीय कर्मचारी , स्वच्छता निरीक्षक ,स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी उपायुक्त डॉ.वैभव विधाते म्हणाले , हिवताप निमुर्लनासाठी स्वच्छता वैद्यकिय विभाग व घनकचरा व स्वच्छता विभाग या दोहांनी  एकत्रित मिळून काम करणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी मिळून व्यवस्थित योजना आखून हिवतापाचे रूग्ण शून्य व्हावे यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना दिल्या.

तसेच मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी म्हणाले, हिवतापाच्या उच्चटनासाठी महापालिकेचे कर्मचारी कायमच प्रयत्न करत असतात. याच्या जोडीला शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांमध्येही हिवतापाबद्दल डॉक्टरांच्या माध्यमातून माहिती देऊन जनजागृती करण्यावरती भर देण्याबाबत त्यांनी सूचविले.

 महापालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागाच्यावतीने किटकजन्य आजाराच्या निमुर्लनासाठी विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत. येत्या काही दिवसात पथनाट्याच्या माध्यमातून किटकजन्य आजाराविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.

*चौकट*

*हिवताप टाळण्यासाठीचे उपाय*

*घरगुती वापरातील पाण्याचे हौद, टाक्या, बॅरल, रांजन, आठवड्यातून किमान एकदा पुसून कोरडे करावेत. त्यांना घट्ट झाकणे बसवावीत, कापडाने बांधावीत.

*डबकी बुजवावीत. पाणी वाहते करावे. साठलेल्या पाण्यात गप्पीमासे सोडावेत.

*घरातील भंगार सामान, निरुपयोगी टायर्सची विल्हेवाट लावावी.

*कुलर, चायनीज पलंट व फ्रिज चा ड्रीप पॅन स्वच्छ ठेवावे.

*शौचालयाच्या नादुरुस्त सेप्टीक टँक दुरुस्त कराव्यात.

*शौचालयाच्या व्हेन्ट पाईपला जाळी बसवावी अथवा कापड बांधावे.

*वैयक्तिक सुरक्षेसाठी डास प्रतिबंधात्मक साधनांचा वापर करावा.

*ताप आल्यास रक्त नमुना तपासुन घ्यावे. आवश्यक औषधोपचार घ्यावा. हिवतापाचे निदान व औषधोपचार सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मोफत उपलब्ध आहेत. हिवताप नियंत्रणासाठी हिवताप निदान व उपचार महत्वाचे आहेत.

चौकट

अॅनाफिलिस डास

अॅनाफिलिस डासांमुळे हिवतापाचा प्रसार होतो. हे डास स्वच्छ पाण्यात तयार होतात. उदा. पाण्याचे हौद, पाण्याच्या टाक्या, डबके, छतावरील पाणी, भातशेतीतील पाणी, कॅनॉल, नदी, नाले, ओढे इत्यादी.

एडीस डास

एडीस डासांमुळे चिकुनगुनिया,डेंग्यू या आजारांचा प्रसार होतो. हे डास घरगुती. स्वच्छ पाण्यात तयार होतात. उदा. हौद, बॅरल, रांजन, पाण्याच्या टाक्या, चायनिज प्लॅंट, डेसर्ट, कुलर, फिजचा ड्रिप पॅन, फुलदाण्या, भंगार, सामान, टायरमध्ये साठलेले पाणी.

क्युलेक्स डास

क्युलेक्स डासांमुळे हत्तीरोगाचा प्रसार होतो. हे डास शौचालयाच्या सेप्टीक टॅक, तुंबलेली गटारे, ड्रेनेज लाईन, अस्वच्छ पाण्यात तयार होतात.

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image