संजोग वाघेरे पाटील यांची शोभा यात्रेला भेट ,कामोठ्यात ठीक ठिकाणी स्वागत ,उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल /प्रतिनिधी
कामोठे रहिवासी सामाजिक संस्था ,ओम शिव शंकर सेवा मंडळ जय हरी महिला मंडळ आयोजित मराठी नाव वर्ष ,गुढीपाढवा निमित्त काढलेल्या शोभा यात्रेत मावळ लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी उपस्थिती दर्शवली ,कामोठे वासियांनी संजोग वाघेरे याना उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वागत केले अनेकांनी उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या सोबत सेल्फी काढून शुभेच्छा दिल्या यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील ,पनवेल महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे , शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीष घरत, राष्ट्रवादीचे नेते सूरदास गोवारी ,माजी नगरसेवक प्रमोद भगत आदी जण उपस्थित होते .
मराठी नाव वर्षानिम्मित ठिकठिकाणी शोभा यात्रा काढण्यात आल्या होत्या त्या त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे याना निमंत्रण देण्यात आले होते त्या त्या ठिकाणी धावती भेट घेत वाघेरे यांनी उपस्थिती लावली ,कामोठ्यातील कामोठे रहिवासी सामाजिक संस्था ,ओम शिव शंकर सेवा मंडळ जय हरी महिला मंडळ आयोजित शोभा यात्रेत शिव शंकर मंदिरात शंकराचे दर्शन घेऊन शोभा यात्रेत सामील झालेल्या वाघेरे यांचे नागरिकांकडून ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले ,अनेकांनी आपल्या लाडक्या नेत्यांसोबत सेल्फी काढून शुभेच्छा दिल्या ,यावेळी संजोग वाघेरे यांनी मावळ मतदार संघातील सर्व नागिरकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन शोभा यात्रेतील कला प्रकार पाहून कलाकारांचे कौतुक केले .यावेळी कामोठे आदिवासी संघाचे सदस्य , महाविकास आघाडीचे पदाधिकारी ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .