पनवेल महापालिका उपायुक्त वैभव विधाते यांची तक्रारदार पत्रकारांवरती दादागिरी

पनवेल महापालिका उपायुक्त वैभव विधाते यांची तक्रारदार पत्रकारांवरती दादागिरी 


पनवेल(प्रतिनिधी)दि.२१-पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव विधाते यांच्या कक्षात खारघरमधील वरीष्ठ पत्रकार,जनसभाचे संपादक आणि खारघर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब मगर हे खारघर सेक्टर-१५ सिग्नलवरती अनधिकृतरीत्या लागणाऱ्या आईस्क्रीमच्या गाडीची तक्रार करण्यासाठी गेले असता श्री.विधाते हे मगर यांना म्हणाले की,तुम्ही माझे मालक नाही,तुम्ही मला काम करायला सांगू शकत नाही.खरेतर मी तुम्हांला माझ्या दालनामध्ये घ्यायला नको होते.वास्तविक या आईस्क्रीमच्या गाडीची तक्रार या अगोदर सुद्धा आप्पासाहेब मगर यांनी प्रभाग अधिकारी आणि उपायुक्त वैभव विधाते यांच्याकडे फोनवरून प्रत्त्यक्ष बोलून आणि व्हाॕट्सअॕपवरती लोकेशनसह फोटो पाठवून केली होती.तसेच येथील काही नागरिकांनी सुद्धा ही गाडी इतरत्र हलवीण्याची तक्रार पालिका अधिकाऱ्यांना केली आहे; पण गेल्या एक महिन्यांपासून महापालिका प्रशासनाने या अनधिकृत  गाडीवरती कोणतीही कारवाई केली नाही.ही गाडी सिग्नलवरती उभी असल्यामुळे येथे रात्रीच्या वेळी अपघातांचे प्रमाण वाढले आहे.या चौकात सेक्टर-१५ मधील वाढत्या उन्हाळ्यामुळे हैराण झालेले नागरीक रात्रीच्यावेळी मोठ्या संख्येने जमत असतात.त्यामध्ये या गाडीचा वहातुकीला अडथळा होऊन नागरिकांना अपघातांचा सामना करावा लागतो.ही साधी बाब महापालिका प्रशासनाला वेळोवेळी सांगून सुद्धा उपायुक्त दर्जाचे अधिकारी तक्रारदार वरिष्ठ पत्रकारांशी उर्मठ आणि असभ्य वर्तन करीत आहेत.ते हे विसरत आहेत की,त्यांची नियुक्तीच जनतेच्या सेवेसाठी आहे आणि त्यांना मीळालेले दालन हे जनता-जनार्दनाच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी शासनाने दीले आहे.

        तक्रारदार संपादक आप्पासाहेब मगर यांच्याशी संपर्क साधला असता ते आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की,पनवेल महापालिकेचे उपायुक्त वैभव विधाते यांच्या या उर्मठ आणि असभ्य वर्तनाविरूद्ध मी पनवेल महापालिका आयुक्त आणि प्रधान नगर विकास सचिवानकडे लेखी तक्रार करून दाद मागणार आहे.

      पालिका उपायुक्त वैभव विधाते यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता,तो होऊ शकला नाही.

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image