भारती विद्यापीठ रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलन्सच्या संस्थापक आणि कोवीच्या अध्यक्षा स्वप्नाली कदम यांच्या कार्याचा सत्कार

भारती विद्यापीठ रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलन्सच्या संस्थापक आणि कोवीच्या अध्यक्षा स्वप्नाली कदम यांच्या कार्याचा सत्कार


नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पीटलचा उपक्रम

 नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्याने मेडीकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबई यांनी समाजात उत्तम कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सत्कार केला. सौ.स्वप्नाली कदम(भारती विद्यापीठ रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलन्सच्या अध्यक्षा) यांना याठिकाणी गौरविण्यात आले.दीपाली पाटील (पीआय,खारघर), कु.स्नेहा पाटील (पीएसआय, खारघर), कु.मीरा सुरेश(ठाण्यातील सामाजिक कार्यकर्त्या) श्रीमती लीना गरड( फोरम,खारघर) सौ.स्वाती पांडुरंग नाईक(पत्रकार, झी न्यूज) आदी महिलांच्या कार्याचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान त्यांना स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

        शिक्षण क्षेत्रातील माझ्या योगदानाबद्दल मला याठिकाणी सन्मानित करण्यात आले. हीच माझ्या कामाची पोचपावती आहे. माझ्या या पिरवासात मला सहकार्य करणाऱ्या सर्वच महिलांचा हा सत्कार आहे. याठिकाणी महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. आज विलिध क्षेत्रात महिला आपली एक नवी ओळख निर्माण करत असून या स्त्रीशक्ती कार्याची दखल घेतल्याबद्दल आणि त्यांना सन्मानित केल्याबद्दल मेडिकवर हॉस्पीटलचे खरोखरच कौतुक वाटत अशी प्रतिक्रिया सौ स्वप्नाली कदम (भारती विद्यापीठ रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलन्सच्या संस्थापक आणि कोवीच्या अध्यक्ष) यांनी व्यक्त केली.

     सर्वच क्षेत्रात महिलांनी बजाविलेल्या उल्लेखनीय कामगिरीची ओळख करून देणारा हा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे. या सर्वच महिलांचे कार्य आणि त्यांचा इथपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे. या कार्यक्रमाच्यामा ध्यमातून करण्यात गौरविण्यात आलेल्या महिलांचे कार्य खरोखरच वाखण्याजोगे असल्याची प्रतिक्रिया डॉ. माताप्रसाद गुप्ता (मेडिकवर हॉस्पिटल्सचे केंद्र प्रमुख) यांनी व्यक्त केली.

Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image