जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचेकडून जेएनपीएचे उन्मेष वाघ यांचे अभिनंदन.

 जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचेकडून जेएनपीएचे उन्मेष वाघ यांचे अभिनंदन.





उरण दि २१(विठ्ठल ममताबादे )जेएनपीएचे उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून उन्मेष वाघ यांची अतिशय चांगली कार्यकीर्द राहिली. सर्वांना सहकार्य करणारे असे मराठी व्यक्तिमत्व ज्यांनी जेएनपीएचे प्रशासकीय काम सुद्धा चोख बजावले. त्यांना आत्ताच जेएनपीएच्या चेअरमन पदाची जबाबदारी मिळाली त्या बद्दल रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी आपल्या पदाधिऱ्यांसोबत उन्मेष वाघ यांची भेट घेवून त्यांचे अभिनंदन केले व स्थानिक प्रकल्पग्रस्तांना आपले नेहमी सहकार्य लाभो अशी अपेक्षा  व्यक्त करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी रायगड काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या सोबत विनोद म्हात्रे, रेखाताई घरत, निर्मला म्हात्रे, हेमंत ठाकूर, श्रीयश घरत, आशुतोष म्हात्रे, निलेश तांडेल प्रमोद पाटील आदि काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.