काॕलनी फोरमचे संस्थापक अर्जुन गरड यांचा वाढदिवस स्वाभिमान दीन म्हणून साजरा
खारघर (प्रतिनिधी)-कॉलनी फोरमचे संस्थापक,मार्गदर्शक व महाराष्ट्र पोलीस दलातील क्राईम ब्ँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री.अर्जुन गरड साहेब यांचा वाढदीवस आज मोठ्या उत्साहात खारघरमधील सेक्टर-१२ येथील गावदेवी मैदानात हजारो हितचिंतक,मित्र आणि विवीध राजकीय पक्षांच्या नेते मंडळींच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
गरड साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्त्य साधून काॕलनी फोरमने ५ वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजनासह पोस्ट आॕफीस आपल्या दारी योजनेअंतर्गत पोस्टाच्या विवीध योजनांचा लाभ इच्छूकांना सवलतीत दीला.
या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त १९४० ते १९९० मधील नामवंत गायकांच्या सदाबहार आणि अजरामर अशा गीतांचा ओमकार निर्मित लाईव्ह आर्केस्ट्रा मनोरंनासाठी आयोजित केला होता.
गरड साहेबांना शुभेछा देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे विधान परिषदेचे आमदार मा. श्री.जयंत पाटील, माजी आमदार मा. श्री. बाळाराम पाटील,पनवेलचे माजी नगराध्यक्ष श्री. जे एम म्हात्रे, माजी नगरसेवक व पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते श्री. प्रीतम जी म्हात्रे,माजी नगरसेवक श्री. गणेश कडू, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री देवेंद्र भाऊ मढवी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख श्री. बबन दादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवा नेते श्री महेबूब शेख, पनवेल जिल्हाध्यक्ष श्री सतीश पाटील, शिवसेना पनवेल जिल्हा प्रमुख श्री रामदासजी शेवाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.