उर्मिला कोठारे व गायत्री दातार शनिवारी पनवेल मध्ये, जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेतर्फे हळदीकुंकूचे आयोजन
पनवेल : आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हळदी कुंकू साजरे करण्याला महत्त्व आहे. हा एक सामाजिक कार्यक्रम आहे जो समाजातील बांधिलकी वाढवतो. हळदी कुंकवाच्या निमित्ताने आपण सुवासिनींना आमंत्रित करतो. या सुवासिनी साक्षात आदिशक्तीचे स्वरूप म्हणून येतात आणि आपण जेव्हा त्यांना हळदी कुंकू लावतो तेव्हा साक्षात आदिशक्तीचे रूप हे जागृत होते. त्यामुळे आपण अप्रत्यक्षरीत्या देवीची म्हणजेच आदिशक्तीची पूजा करतो. हळदी-कुंकूवा बरोबरच सुवासिनींना वाण म्हणून एक भेटवस्तू देखील दिली जाते.