खारघर मधील रस्त्याला माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांचे नाव द्या;शेकाप पनवेल विधानसभा उपाध्यक्ष अजित अडसूळे यांची मागणी

खारघर मधील रस्त्याला माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांचे नाव द्या;शेकाप पनवेल विधानसभा उपाध्यक्ष अजित अडसूळे यांची मागणी


पनवेल(प्रतिनिधी) - पनवेल महापालिका हद्दीतील खारघर मधील सेक्टर 27 परिसरातील रस्त्याला माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांचे नाव द्या अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका उपाध्यक्ष अजित अडसूळे यांनी केली आहे.माजी आमदार दत्तूशेठ पाटील हे पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये लागोपाठ तीनवेळा शेतकरी कामगार पक्षाच्या तिकीटावरती निवडून आले होते.त्यानंतर त्यांनी स्वयस्फुर्थीने राजकीय सन्यांस घेतला होता.तसेच तळोजा एम.आय.डी.सी.स्थापन करण्यांमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे.अशा सामाजिक,आर्थिक,राजकीय व औध्योगिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या  व्यक्तीचे नांव येथील रस्त्याला देणे उचित ठरेल,असेही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.तसेच या मार्गाला एस. बी. सोमाणी यांचे नाव देण्याच्या पालिकेने केलेल्या ठरावाला देखील अडसूळे यांनी विरोध दर्शवला आहे. खारघर वसाहती मधील सेक्टर 27 परिसरात बी.डी.सोमाणी इंटरनॅशनल शाळे पासून 45 मीटर रुंदीच्या रस्त्यापर्यत शाळेपर्यत 40 मीटर रुंदीच्या रस्त्याला एस बी सोमाणी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पालिकेने संमत केला आहे.पालिकेच्या या निर्णयाला पालिका हद्दीतील स्थानिकांकडून विरोध होत असून,अडसूळे यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवत माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली आहे.