साप्ताहिक रायगड पनवेलच्या कार्यालयाचे उदघाटन उत्साहात संपन्न

साप्ताहिक रायगड पनवेलच्या कार्यालयाचे उदघाटन उत्साहात संपन्न



पनवेल दि.०४(वार्ताहर): आपल्या आक्रमक बातम्यांमुळे रायगड जिल्ह्यात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक रायगड पनवेलच्या कार्यालयाचे उदघाटन नवीन पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वराज पाटील  यांच्या हस्ते संपन्न झाले. 

          या वेळी आदई-नेवाळी  ग्रामपंचायतीचे सरपंच रमाकांत गरुडे, ग्रामपंचायत पाली देवद सुकापूरचे भाजप अध्यक्ष  राजेश पाटील, पत्रकार संजय कदम, रसायनी टाइम्सचे संपादक अनिल भोळे, रायगड पनवेलचे उपसंपादक मनोहर पाटील, साप्ताहिक रायगड पनवेलचे प्रतिनिधी उमेश पाटील, सुरेश कथारा, साप्ताहिक वार्तांकनचे संपादक संतोष सुतार, अँटी करपशन महाराष्ट्र अध्यक्ष विद्यासागर ठाकूर, एएचएफ प्रशासकीय आणि उपक्रम संचालक महेश भडके, दिपेश साळसकर, शिवम केळकर (पुणे जिल्हा उपक्रम व्यवस्थापन अधिकारी), अग्निशमन दलाचे संदीप गायकवाड, कृष्णा गोसावी आदी उपस्थित होते. यावेळी साप्ताहिक रायगड पनवेलचे संपादक संतोष भगत, साप्ताहिक रायगड पनवेलच्या मालक-मुद्रक-प्रकाशक सुलोचना भगत, साक्षी भगत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सनित म्हात्रे, हेमांगी थळी, सुषमा मोरे यांनी मेहनत घेतली.

Popular posts
भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने दोन दिवसीय आधार व मोफत आयुष्यमान भारतकार्ड शिबिर संपन्न
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या लढाऊ पाठपुराव्याला यश!-सिडकोच्या LIG व EWS घरांच्या किमती झाल्या 10% नी कमी;महायुती सरकारची सभागृहात घोषणा!
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
नाताळ व नवीन वर्षांच्या पार्श्‍वभुमीवर बनावट मद्य वाहतुकीवर पनवेल परिसरात कारवाई
Image
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image