आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते काशीराम जी पैठणे यांची ग्लोबल ह्यूमन राइट प्रोटेक्शन फोरम या संस्थेवर राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती
बुलढाणा विशेष प्रतिनिधी:
आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या डेमोक्रॅटिक गटाचे राज्य संघटक सचिव व भारतीय कर्मचारी मजदुर युनियन महाराष्ट्रउपाध्यक्ष भारतरत्न डॉक्टरबाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि धम्म रत्न आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी आंबेडकरी चळवळीचे नेते माननीय काशीराम जी पैठणे धोत्रा नंदाई पोस्ट सरंबा तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा यांची यांची ग्लोबल ह्युमन राईट प्रोटेक्शन फोरम या संस्थेच्या भारताच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाले असल्याचे पत्र ग्लोबल ह्यूमन राईट प्रोटेक्शन फोरमचे चेअरमन व फाउंडर संस्थापक महानंदा सरकार दत्ता आसाम गुहाटी यांनी नुकतेच 14.1.2024 रोजी त्यांची निवड होत असल्याचे पत्र दिले असल्याचे महाराष्ट्र स्टेट प्रेसिडेंट ग्लोबल ह्युमन राइट्स प्रोटेक्शन फोरम प्राध्यापक गोरख साठे सर बारामती यांनी वार्तालाप करताना सांगितले आहे .माननीय काशीरामजी पैठणे हे आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते असून त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्ताराच्या काळामध्ये प्रचंड काम केलेले असून अनेक धार्मिक सामाजिक सांस्कृतिक चळवळीमध्ये काम केलेले आहे भारताच्या संविधानाच्या बचाव आंदोलनामध्ये आद्य प्रेरक म्हणून त्यांनी काम केलं असून चलो बुद्ध की और या मिशनच्याद्वारे त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील 18 संस्थांच्या माध्यमातून नुकताच पाच पुरस्कार सोहळे सामाजिक समानतेच्या विषयावरी पाच राष्ट्रीय परिषदा भारतात झाल्या असून येत्या 27 फेब्रुवारी रोजी त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लुंबिनी नेपाळ येथे भारतातील सामाजिक समानता या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक समानतेचे मौलिक विचार या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केले असून त्याचे तेथे अध्यक्ष असल्याचे प्राध्यापक गोरख साठे यांनी सांगितले आहे प्रोटेक्शन फोरम या संस्थेच्या भारताच्या उपाध्यक्षपदी त्यांची नेमणूक झाली असल्याचे संस्थेचे चेअरमन महानंदा सरकार दत्ता यांनी कळवला आहे ग्लोबल ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फोरम ही संस्था मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर निती आयोग मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिन एम्पॉवरमेंट गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांनी मंजूर केलेल्या असून या संस्थेचे काशीरामजी पैठणे उपाध्यक्ष झाल्यामुळे भारतातल्या सर्व सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे खऱ्या अर्थाने ग्लोबल ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फोरम ही भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणारी संस्था असून भारतीय नागरिकांच्या हक्कासाठी न्यायासाठी मानवी अधिकाराच्या साठी राज्यघटनेचे संरक्षण करण्याच्या करिता या संस्थेचा उपाध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्यामुळे मला सामाजिक कार्यात खूपच उत्साह आला असल्याचे आनंद वाटत आहे मी माझे सामाजिक काम या फोरमचा अध्यक्ष राष्ट्रीय सेक्रेटरी यांना विश्वासात घेऊन करीन तसेच माझी ग्लोबल ह्युमन राइट्स प्रोटेक्शन फोरमच्या भारताच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे समाजातील तळागाळातील लोकांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत राहीन असे मत ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत काशीरामजी पैठणे यांनी आपले मत प्रतिपादन केले आहे सर्व स्तरातून काशीराम पैठणे साहेब यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.