खारघर वाहतूक शाखेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमाबाबत जनजागृती

खारघर वाहतूक शाखेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमाबाबत जनजागृती


नवीन पनवेल : वाहतुकीच्या नियमाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने खारघर वाहतूक शाखेच्या खारघर येथील गोखले एज्युकेशन सोसायटी हायस्कूलमध्ये वाहतूक नियमानबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खारघर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष मनधर काणे यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांबाबत जनजागृतीपर मार्गदर्शन केले.

      सध्याच्या धावपळीच्या काळामध्ये रस्त्यावरील वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन, अपघातांच्या घटनात वाढ होताना दिसून येत आहे अनेक वाहन चालकांकडून वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्यामुळे अपघात घडत असल्याचे निदर्शनास आले आहे . त्यामुळे शालेय विद्यार्थी व युवा पिढीमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती झाल्यास लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये एक शिस्तप्रिय चालकाची संकल्पना स्पष्ट होईल. यासाठी वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त तिरुपती काकडे यांनी विविध उपक्रम सुरू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर खारघर वाहतूक शाखेच्या वतीने खारघर येथील गोखले एज्युकेशन सोसायटी स्कूलमध्ये विशेष कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले या जनजागृतीपर विशेष कार्यक्रमात खारघर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष मनधर काणे व पोलीस उपनिरीक्षक संजिव शिंदे यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमाचे महत्त्व पटवून देतानाच अपघात कसे घडतात आणि अपघात कसे टाळता येऊ शकतात याचे मार्गदर्शन केले तसेच आपण स्वतः इतरांनी वाहतुकीचे नियम कसे पाळावेत याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी खारघर वाहतूक शाखा तसेच शाळेचे मुख्याध्यापक, संपूर्ण स्टाफ सह एकूण १६१ विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
Popular posts
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा;फलटणच्या रंजीत जाधवचा सायकल प्रवास :
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नामकरण वाद उच्च न्यायालयात;केंद्र सरकारची भूमीका होणार स्पष्ट.
Image
भविष्यात येणाऱ्या सर्व शैक्षणिक अडचणींमधे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष विद्यार्थ्यांच्या सोबत उभा राहील - शिवसेना उपनेते बबनदादा पाटील
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेलचा ओंकारेश्वर आगमन सोहळा संपन्न;श्री.प्रितमदादा म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती
Image