39 लाख चौसष्ट हजारांची फसवणूक

 39 लाख चौसष्ट हजारांची फसवणूक 

नवीन पनवेल : इमारत बांधकामासाठी लागणारे स्टील घेऊन त्याचे पैसे न देता आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तिघां विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
     विनोद कुमार बंसल हे खारघर सेक्टर 34 ए येथे राहत असून त्यांचा विजय स्टील नावाने पळस्पे फाटा जवळ कोळखे गाव येथे स्टीलचा व्यवसाय आहे. मे 2023 मध्ये शोएब खान आणि ऋषी हे दुकानावर येऊन त्यांनी इमरान खान यांच्यासोबत एम आय ट्रेडिंग नावाने स्टीलचा व्यवसाय करत असून ऑफिस मिरा रोड येथे आहे व स्टीलची आवश्यकता असून ऍडव्हान्स पेमेंट देऊन बिल्डिंग बांधण्यासाठी लागणारे स्टील खरेदी केले.बऱ्याच वेळा त्यांनी स्टील खरेदी केले व पेमेंट केले. त्यामुळे त्यांनी विश्वास संपादित केला होता. त्यानंतर जून 2023 मध्ये फोन द्वारे संपर्क साधून दोन गाड्यांमध्ये 64 हजार 160 किलो वजनाचे 39 लाख 64 हजार 65 रुपये किमतीचे स्टील पाठवून देण्यात आले. दोन दिवसांनी पेमेंट करतो असे सांगितले. या मालाचे पेमेंट न केल्याने संपर्क साधला असता पेमेंट देणार असल्याचे सांगितले त्यानंतर सतत उडवा उडवीची उत्तरे दिली व पेमेंट करण्यास टाळाटाळ करू लागला. मिरा रोड येथे इमरान खान याला भेटले असता समोरील पार्टी कडून पेमेंट येण्यास अडचण येत असल्याचे सांगितले. त्यानंतर इमरान खान, शोएब खान व ऋषी यांच्याशी संपर्क साधून पेमेंट विचारणा केले असता त्यांनी टाळाटाळ करून स्टीलचे पेमेंट दिले नाही. त्यानंतर नोटरी कराराप्रमाणे चेक दिला मात्र तो देखील चेक बाऊन्स झाला आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच इमरान खान, शोएब खान आणि ऋषी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image